काँग्रेसचे खासदार राजीव सातव गडकरी वाड्यावर !

काँग्रेसचे खासदार राजीव सातव गडकरी वाड्यावर !

हिंगोलीचे काँग्रेस खासदार राजीव सातव यांनी शनिवारी दुपारी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या वाड्यावर जाऊन त्यांची भेट घेतली.

  • Share this:

16 सप्टेंबर : काँग्रेसचे खासदार राजीव सातव यांनी भाजपचे नेते आणि केंद्रीय दळवणवळण मंत्री नितीन गडकरींची भेट घेतल्याने राजकीय चर्चांना उधाण आले आहे.

हिंगोलीचे काँग्रेस खासदार राजीव सातव यांनी शनिवारी दुपारी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या वाड्यावर जाऊन त्यांची भेट घेतली.

विशेष म्हणजे खासदार सातव हे आज दुपारी १ वाजून १५ मिनिटांच्या सुमारास गडकरींच्या निवासस्थानी पोहोचले. तर गडकरी हे १ वाजून २५ मिनिटांच्या सुमारास आपल्या निवासस्थानी पोहोचले.

या भेटीबाबत भेटीबाबत कमालीची गुप्तता पाळण्यात आली. सातव यांना गडकरी भेटीबाबत विचारले असता ही भेट मतदार संघातील समस्यांबाबत घेतली असल्याचे त्यांनी सांगितलं.

विदर्भातील नाराज असलेल्या काँग्रेस नेत्यांनी एकत्र येत दबावगट तयार करून हायकमांडकडे विदर्भ प्रदेश काँग्रेसची स्थापना करण्याची मागणी करण्याचा निर्णय घेतलाय. यामुळे आता प्रदेश काँग्रेसमध्ये उघड दोन गट पडल्याचे चित्र समोर आले आहे. या पार्श्वभूमीवर खासदार सातव यांनी गडकरींची भेट घेतल्याने राजकीय वर्तुळात उलटसुलट चर्चेला उधाण आले आहे.

First published: September 16, 2017, 11:23 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading