मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

'वाईन प्यायल्याने कोरोना बरा होतो', दाव्यात किती तथ्य? खुद्द आरोग्यमंत्र्यांनीच केला खुलासा

'वाईन प्यायल्याने कोरोना बरा होतो', दाव्यात किती तथ्य? खुद्द आरोग्यमंत्र्यांनीच केला खुलासा

वाईन प्यायल्याने कोरोनापासून दूर राहता येतं, अशा प्रकारचा मेसेज सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे.

वाईन प्यायल्याने कोरोनापासून दूर राहता येतं, अशा प्रकारचा मेसेज सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे.

वाईन प्यायल्याने कोरोनापासून दूर राहता येतं, अशा प्रकारचा मेसेज सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे.

  • Published by:  Akshay Shitole

मुंबई, 18 मार्च : कोरोना व्हायरसमुळे जगभरातील अनेक देशांमध्ये अक्षरश: लॉकडाऊन करण्याची वेळ आली आहे. भारतातही या व्हायरसचा शिरकाव झाला असून तो वेगाने पसरण्याचा धोका निर्माण झाला आहे. मात्र या व्हायरसआधी त्याच्यावरील उपाय सांगणाऱ्या अफवाच अधिक वेगाने पसरू लागल्या आहेत. अशातच वाईन प्यायल्याने कोरोनापासून दूर राहता येतं, अशा प्रकारचा मेसेज सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे. याबाबत आता थेट आरोग्यमंत्र्यांनीच भाष्य केलं आहे.

'राज्यभरात आतापर्यंत 42 जण कोरोना पॉझिटिव्ह आहेत. सर्वांची परिस्थिति स्थिर आहे. गर्दी टाळण्यासाठी एपिडेमिक कायदा लागू करण्यात आला आहे. मात्र खासगी लॅबना अजून कोरोना चाचणी करण्याची परवानगी देण्यात आलेली नाही. नायडू रूग्णालयात 100 तर वाय.सी.एम. रूग्णालयात 60 बेड्स सुरू करण्यात आले आहेत. तर वर्क फ्रॉम होमची काटेकोरपणे अंमलबजावणी होईल, यासाठी खबरदारी घेण्यात येत आहे,' अशी माहिती राजेश टोपे यांनी दिली आहे.

एकीकडे आरोग्यमंत्री राजेश टोपे हे कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी राज्य सरकार करत असलेल्या उपाययोजनांबद्दल भाष्य करत होते, त्याचवेळी त्यांना सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या वाईनच्या मेसेजबद्दल प्रश्न विचारण्यात आला. त्यावेळी टोपे यांनी स्पष्ट शब्दांमध्ये ही अफवा असून वाईन प्यायल्याने कोरोना रोखण्यासाठी काहीही उपयोग होत नसल्याचं म्हटलं आहे.

आरोग्यमंत्र्यांनी कोणत्या घोषणा केल्या?

कोरोनाव्हायरच्या चाचणीसाठी महाराष्ट्रात येत्या आठवड्याभरात सुरू होणार 8 नव्या लॅब. उद्यापासूनच 4 नव्या लॅब सुरू होणार हाफकिन्समध्येही होणार कोरोनाव्हायरसची चाचणी

राज्यातली क्वारन्टाइनसाठीचे बेड वाढवले.

आयसोलेशन वॉर्ड वाढवले.

पुण्यातील 8 खासगी रुग्णालयांना विलगीकरण्यासाठी परवानगी

लवकरच केंद्राकडून कोरोनाव्हायरससंदर्भातल्या 10,000 किट मिळणार

First published: