मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /राज्यात omicron चा शिरकाव, पुन्हा लॉकडाऊन लागणार का? राजेश टोपेंनी दिले स्पष्ट उत्तर

राज्यात omicron चा शिरकाव, पुन्हा लॉकडाऊन लागणार का? राजेश टोपेंनी दिले स्पष्ट उत्तर

'आपण जर काळजी घेतली नाही तर तिसरी लाट ओमायक्रॉनची देखील असू शकते, तिसऱ्या लाटेसाठी राज्य सज्ज आहे'

'आपण जर काळजी घेतली नाही तर तिसरी लाट ओमायक्रॉनची देखील असू शकते, तिसऱ्या लाटेसाठी राज्य सज्ज आहे'

'आपण जर काळजी घेतली नाही तर तिसरी लाट ओमायक्रॉनची देखील असू शकते, तिसऱ्या लाटेसाठी राज्य सज्ज आहे'

जालना, 04 डिसेंबर :  कोरोनाचा (corona) नवा घातक व्हेरिएंट ओमायक्रॉनने (Omicron) महाराष्ट्रात (maharashtra) एंट्री केली आहे. त्यामुळे आरोग्य यंत्रणा खडबडून जागी झाली आहे. राज्यात पुन्हा लॉकडाऊन लागणार का अशी चर्चा रंगली आहे. पण, लॉकडाऊन लावणे हे परवडणारे नाही, असं राजेश टोपे यांनी स्पष्ट केलं.

जालना, 04 डिसेंबर :  कोरोनाचा (corona) नवा घातक व्हेरिएंट ओमायक्रॉनने (Omicron) महाराष्ट्रात (maharashtra) एंट्री केली आहे. त्यामुळे आरोग्य यंत्रणा खडबडून जागी झाली आहे. त्यामुळे राज्यात पुन्हा लॉकडाऊन लागणार का अशी चर्चा रंगली आहे. पण, लॉकडाऊन लावणे हे परवडणारे नाही, असं राजेश टोपे यांनी स्पष्ट केलं.

डोंबिवलीमध्ये राहणारा 33 वर्षीय तरुण ओमायक्रॉन पॉझिटिव्ह आढळला आहे. यावर राजेश टोपे यांनी प्रतिक्रिया देत जनतेला लसीकरण करण्याचे आवाहन केले आहे.

लस न घेताच दक्षिण आफ्रिका, दुबई व्हाया डोंबिवली omicron positive रुग्णाचा प्रताप

आपण जर काळजी घेतली नाही तर तिसरी लाट ओमायक्रॉनची देखील असू शकते, तिसऱ्या लाटेसाठी राज्य सज्ज आहे पण सध्या निर्बंध किंवा लॉकडाऊन लावण्याचा कोणताही विचार नाही, तसं केल्यास लोकांना त्रास होईल, असं राजेश टोपे यांनी स्पष्ट केलं.

'दक्षिण आफ्रिकेमध्ये ओमायक्रॉन संसर्ग पसरण्याचे प्रमाण हे मोठ्या प्रमाणात आहे. पॉझिटिव्ह रुग्णाला आयसीयू, ऑक्सिजन लागत असल्याचे कोणतेही प्रकरण समोर आले नाही. अजून WHO कडून अभ्यास सुरू आहे. त्याकडून अधिक माहिती मिळेल, त्यानंतर पुढील कारवाई करण्यात येईल. तोपर्यंत महाराष्ट्रातील जनतेनं घाबरून जाऊ नये. मात्र आपण जर काळजी घेतली नाही तर तिसरी लाट ओमायक्रॉनची देखील असू शकते, त्यामुळे नागरिकांनी लसीकरण करून घ्यावं, मास्क काढू नये असं आवाहन टोपे यांनी केलं.

'डोंबिवलीमध्ये आढळलेल्या रुग्णाची प्रकृती उत्तम'

'केपटाऊन, दुबई आणि दिल्ली असा प्रवास करून डोंबिवलीमध्ये आला. त्याला सौम्य स्वरुपाचा त्रास आहे. खोकला आहे. नेहमीची जी लक्षण आढळतात तशी आढळली होती. या तरुणाची जीनोम सिक्वेन्सिंग चाचणी घेण्यात आली असता त्यात तो पॉझिटिव्ह आढळला आहे.

या रुग्णावर कोविड केअर सेंटरमध्ये सुरू आहे. या तरुणाची प्रकृती उत्तम आहे. कोणताही अडचण नाही. या तरुणाने कोरोनाची कोणतीही लस घेतली नव्हती' असं टोपे यांनी सांगितलं.

Bank Jobs: राज्यातील 'या' अर्बन कोऑपरेटिव्ह बँकेत विविध पदांसाठी Vacancy

त्याचबरोबर आरोग्य विभागाकडून पुढील कारवाई सुरू आहे. या रुग्णांच्या संपर्कात आलेल्या १२ हाय रिस्क व्यक्तींचे स्वॅब घेण्यात आले आहे. तर २३ जण हे लो रिस्क आहे जे या रुग्णाच्या संपर्कात आले आहे, त्यांचेही स्वॅब घेण्यात आले आहे, असंही टोपे यांनी सांगितलं.

तसंच, 'दिल्ली ते मुंबई प्रवासादरम्यान या तरुणाच्या २५ जण संपर्कात आले होते. त्या सर्वांची चाचणी ही कोविड निगेटिव्ह आढळून आली आहे. आता राज्यात ओमायक्रॉनचा रुग्ण आढळला आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील सर्व नागरिकांनी काळजी घेण्याची गरज आहे, असं आवाहनही टोपे यांनी केलं.

First published:
top videos

    Tags: Rajesh tope