मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

डोंबिवलीतील omicron positive रुग्णाबद्दल राजेश टोपेंनी दिली महत्त्वाची माहिती, म्हणाले...

डोंबिवलीतील omicron positive रुग्णाबद्दल राजेश टोपेंनी दिली महत्त्वाची माहिती, म्हणाले...

 आता राज्यात ओमायक्रॉनचा रुग्ण आढळला आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील सर्व नागरिकांनी काळजी घेण्याची गरज आहे,

आता राज्यात ओमायक्रॉनचा रुग्ण आढळला आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील सर्व नागरिकांनी काळजी घेण्याची गरज आहे,

आता राज्यात ओमायक्रॉनचा रुग्ण आढळला आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील सर्व नागरिकांनी काळजी घेण्याची गरज आहे,

जालना, 05 डिसेंबर : कोरोनाचा (corona) नवा घातक व्हेरिएंट ओमायक्रॉनने (Omicron) महाराष्ट्रात (maharashtra) शिरकाव केला आहे. दक्षिण आफ्रिकेवरून आलेला तरुण ओमायक्रॉन पॉझिटिव्ह (omicron positive)  आढळला आहे. पण, या तरुणाची प्रकृती उत्तम आहे, त्याला कोणताही त्रास नाही. या रुग्णांच्या संपर्कात आलेल्या हायरिस्क असलेल्या 12 जणांचे स्वॅब घेण्यात आले आहे, अशी माहिती राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे (rajesh tope) यांनी दिली.

डोंबिवलीमध्ये राहणारा 33 वर्षीय तरुण ओमायक्रॉन पॉझिटिव्ह आढळला आहे. या रुग्णाबद्दल राजेश टोपे यांनी महत्त्वाची माहिती दिली.

'केपटाऊन, दुबई आणि दिल्ली असा प्रवास करून डोंबिवलीमध्ये आला. त्याला सौम्य स्वरुपाचा त्रास आहे. खोकला आहे. नेहमीची जी लक्षण आढळतात तशी आढळली होती. या तरुणाची जीनोम सिक्वेन्सिंग चाचणी घेण्यात आली असता त्यात तो पॉझिटिव्ह आढळला आहे.

या रुग्णावर कोविड केअर सेंटरमध्ये सुरू आहे. या तरुणाची प्रकृती उत्तम आहे. कोणताही अडचण नाही. या तरुणाने कोरोनाची कोणतीही लस घेतली नव्हती' असं टोपे यांनी सांगितलं.

BREAKING : ओमायक्रॉन महाराष्ट्रात धडकला, डोंबिवलीत आढळला पहिला रुग्ण!

त्याचबरोबर आरोग्य विभागाकडून पुढील कारवाई सुरू आहे. या रुग्णांच्या संपर्कात आलेल्या १२ हाय रिस्क व्यक्तींचे स्वॅब घेण्यात आले आहे. तर २३ जण हे लो रिस्क आहे जे या रुग्णाच्या संपर्कात आले आहे, त्यांचेही स्वॅब घेण्यात आले आहे, असंही टोपे यांनी सांगितलं.

Bank Jobs: राज्यातील 'या' अर्बन कोऑपरेटिव्ह बँकेत विविध पदांसाठी Vacancy

तसंच, 'दिल्ली ते मुंबई प्रवासादरम्यान या तरुणाच्या २५ जण संपर्कात आले होते. त्या सर्वांची चाचणी ही कोविड निगेटिव्ह आढळून आली आहे. आता राज्यात ओमायक्रॉनचा रुग्ण आढळला आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील सर्व नागरिकांनी काळजी घेण्याची गरज आहे, असं आवाहनही टोपे यांनी केलं.

First published:

Tags: Rajesh tope