राजेश बनगेरानेच गौरी लंकेश आणि दाभोलकरांच्या मारेकऱ्यांना दिले शस्त्र प्रशिक्षण

राजेश बनगेरानेच गौरी लंकेश आणि दाभोलकरांच्या मारेकऱ्यांना दिले शस्त्र प्रशिक्षण

गौरी लंकेश आणि दाभोलकरांच्या मारेकऱ्यांना शस्त्र प्रशिक्षण देणारा कोण आहे राजेश बनगेरा ?

  • Share this:

मुंबई, 24 ऑगस्ट : कर्नाटक शिक्षण विभागाच्या कर्मचाऱ्यानेच अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे अध्यक्ष नरेंद्र दाभोलकरांच्या मारेकऱ्यांना प्रशिक्षण दिल्याचं समोर आलं आहे . राजेश बनगेराकडून गौरी लंकेश आणि दाभोलकरांच्या मारेकऱ्यांना शस्त्र प्रशिक्षण देण्यात आल्याचं कर्नाटक SITच्या चौकशीत समोर आलं आहे. 23 जुलै रोजी अटक करण्यात आलेल्या 50 वर्षीय राजेश बनगेरा याच्यावर तरुणांना शस्त्र चालवण्याचं प्रशिक्षण देण्याची जबाबदारी सोपवण्यात आली होती. राजेश बनगेरानेच सचिन अंदुरे आणि शरद कळसकर यांना प्रशिक्षण दिल्याचं SIT च्या चौकशीतून सांगण्यात आलं आहे.

बनगेरा हा सध्या कर्नाटक एसआयटीच्या ताब्यात आहे. त्याने तब्बल 50 जणांना पिस्तुल चालवण्याचं प्रशिक्षण दिलं असल्याची माहिती एसआयटीने दिली आहे्.

पुण्याच्या फर्गुसन कॉलेजमध्ये प्राचार्यांनी घातली सत्यनारायण पूजा!

कोण आहे राजेश बनगेरा ?

- राजेश बनगराचे वय 50 वर्षं

- कर्नाटकमधील मडिकेरीचा रहिवासी

- मंगलोरमध्ये शिक्षण विभागातील कर्मचारी

- बनगेराकडे 2 परवानाधारक पिस्तूल

- कराटेमध्ये ब्लॅक बेल्टधारक

- 50 तरुणांना पिस्तूल चालवण्याचं प्रशिक्षण

- 23 जुलै 2018ला कर्नाटक एसआयटीकडून अटक

- ट्रेनिंग देणाऱ्या युवकांची नाव माहीत नव्हती - बनगेरा याची कर्नाटक एसआयटीला माहिती - सूत्र

दरम्यान, डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येप्रकरणी अटकेत असलेल्या सचिन अंदुरेच्या माहिती नुसार सीबीआयने औरंगाबादमध्ये झाडाझडती घेऊन काही हत्यारं जप्त केली आहे. या प्रकरणी सीबीआयच्या तक्रारीवरून शस्त्र लपवणं आणि बेकायदा शस्त्र बाळगण्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सिटीचौक पोलिसात शुभम सुरळे, अजिंक्य सुरळे, रोहित रेघे या तिघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एक गावठी पिस्तुल, एक एअर पिस्तुल, तीन जिवंत काडातूस, एक कुकरी, एक तलवार अस साहित्य या तिघांकडे असल्याची तक्रार सीबीआयने दिली आहे. जप्त केलेलं साहित्य दाभोलकरांच्या हत्येत वापरलं गेल्याचा संशय आहे. याबाबत पुढील तपास सीबीआय करणार आहे.

 

'Post Office'ची नवी सुविधा, 5 वर्षाच्या गुंतवणुकीवर मिळणार बक्कळ पैसे

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Aug 24, 2018 01:15 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading