मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

BMC Election 2022 : मागच्या वेळी फेर बंदर, हनुमान टेकडी वार्डाचा निकाल धक्कादायक, यावेळी पुन्हा राजेंद्र नरवणकरांना संधी मिळणार?

BMC Election 2022 : मागच्या वेळी फेर बंदर, हनुमान टेकडी वार्डाचा निकाल धक्कादायक, यावेळी पुन्हा राजेंद्र नरवणकरांना संधी मिळणार?

वार्ड क्रमांक 2016मध्ये फेर बंदर, रे रोड, हनुमान टेकडी हा परिसर येतो. याठिकाणी मागच्या निवडणुकीत जो निकाल लागला, त्यावर कुणाचाच विश्वास नव्हता.

वार्ड क्रमांक 2016मध्ये फेर बंदर, रे रोड, हनुमान टेकडी हा परिसर येतो. याठिकाणी मागच्या निवडणुकीत जो निकाल लागला, त्यावर कुणाचाच विश्वास नव्हता.

वार्ड क्रमांक 2016मध्ये फेर बंदर, रे रोड, हनुमान टेकडी हा परिसर येतो. याठिकाणी मागच्या निवडणुकीत जो निकाल लागला, त्यावर कुणाचाच विश्वास नव्हता.

  • Published by:  News18 Desk
मुंबई, 28 जुलै : देशातील सर्वात श्रीमंत महानगरपालिका असलेल्या मुंबई महानगरपालिकेची निवडणूक आगामी काळात लवकरच होणार आहे. (BMC Election 2022) त्यामुळे या निवडणुकीची उत्सुकता सर्वांनाच लागली आहे. राजकीय पक्षांनीही या दृष्टीने तयारी सुरू केली आहे. दरम्यान या निवडणुकांच्या अगोदरच राज्यात शिवसेनेत फूट पडल्याने सत्तापालट झाला आणि राजकीय चित्र क्षणांत पालटलं आहे. वार्ड क्रमांक 2016 हनुमान टेकडीचा (Ward no. 216) विचार केला तर याठिकाणी 2017च्या निवडणुकीचा निकाल धक्कादायक लागला होता. याठिकाणी बीएमसीचे निवृत्त अभियंता राजेंद्र नरवणकर यांनी बाजी मारली होती. मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर न्यूज 18 लोकमतने वार्डनिहाय आढावा घेतला. जाणून घ्या, वार्ड क्रमांक 2016बाबत. वार्ड क्रमांक 2016मध्ये फेर बंदर, रे रोड, हनुमान टेकडी हा परिसर येतो. याठिकाणी मागच्या निवडणुकीत जो निकाल लागला, त्यावर कुणाचाच विश्वास नव्हता. त्याला कारणही तितकंच ठोस होते. या निवडणुकीत तत्कालीन स्थायी समिती अध्यक्ष यशोधर फणसे, तत्कालीन सभागृह नेत्या तृष्णा विश्वासराव आणि पाचवेळा नगरसेविका वकारुनिसा अन्सारी यांच्यासह अनेक अनुभवी आणि ज्येष्ठ नगरसेवकांचा पराभव झाला होता. त्यांच्याविरोधात फक्त दोनच वर्षांपूर्वी राजकारणात आलेले बीएमसीचे निवृत्त अभियंता राजेंद्र नरवणकर यांनी ही निवडणूक जिंकली. निवडणूक जिंकल्यानंतर सर्वांचे राजेंद्र नरवणकर यांच्यावर लक्ष होते. त्यामुळे त्यांच्या कामाबाबतही चर्चा होणारच. नरवणकर यांनी पावसाळ्यात जे काम केले त्याबाबत जास्त चर्चा झाली. याठिकाणी 3 पूर्णपणे भूमिगत असलेले मोठे नाले आहेत. त्यांनी पाणी बाहेर जाण्यासाठी तीन लहान नाले चांगल्या प्रकारे डिझाईन केले. तसेच चांगले पंपिंग स्टेशन आणि एक व्यवस्थित ड्रेनेज सिस्टम असल्याने अतिवृष्टी झाली तर पाणी साचू शकत नाही, अशी व्यवस्था त्यांनी याठिकाणी तयार केली, अशी माहिती त्यांनी माध्यमांना दिली होती. हेही वाचा - BMC Election: मुंबईतील वॉर्डचे आरक्षण जाहीर; अनेक दिग्गजांना फटका, वाचा कुणाला दिलासा अन् कुणाला झटका मागच्या निवडणुकीत धक्कादायक निकालानंतर यावेळी प्रमुख राजकीय पक्ष आणखी तयारीने निवडणुकीच्या रिंगणात उतरतणार आहेत. त्यामुळे यावेळी मतदार पुन्हा काँग्रेसच्या राजेंद्र नरवणकर यांना संधी देतात की अन्य दुसऱ्या पक्षाच्या उमेदवाराच्या गळ्यात नगरसेवक पदाची माळ घालतात, हे निवडणुकीच्या निकालानंतर स्पष्ट होणार आहे. निवडणुकीची सर्वांना उत्सुकता लागली आहे. राज्यातील सत्तातरांचा परिणाम होणार -  नुकतेच राज्यात झालेल्या सत्तांतरानंतर राज्यातील शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस या तिन्ही पक्षांचे सरकार कोसळले. शिवसेनेचे ज्येष्ठ नेते एकनाथ शिंदे यांच्यासह 40 हून अधिक आमदारांनी बंडखोरी करत वेगळा गट स्थापन केला आहे. त्यामुळे आता राज्यात भाजप आणि शिंदे गटाचे सरकार स्थापन झाले आहे. भाजपने शिंदेगटाला पाठिंबा देत एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री बनवले. तर देवेंद्र फडणवीस यांना उपमुख्यमंत्री बनवले आहे. शिवसेनेचे दोन गट झाल्याने कोणती शिवसेना खरी असा कोणती नाही असा प्रश्न उपस्थित झाला आहे. त्यामुळे या सत्तातरांचा या वार्डावर काय परिणाम होतो, ते पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
First published:

Tags: BMC, Election, Mumbai

पुढील बातम्या