'तिकीट द्या नाहीतर पक्ष सोडतो', राष्ट्रवादीच्या नेत्याचे थेट शरद पवारांना आव्हान!

'तिकीट द्या नाहीतर पक्ष सोडतो', राष्ट्रवादीच्या नेत्याचे थेट शरद पवारांना आव्हान!

विधानसभा निवडणुकीत राजेंद्र गावित यांनी शहादा मतदारसंघात राष्ट्रवादीतून विधानसभा निवडणूक लढवली होती. यावेळीही जर तिकीट मिळालं नाही तर दुसऱ्या पक्षात जाणार असल्याचा इशारा गावित यांच्याकडून देण्यात आला आहे.

  • Share this:

निलेश पवार,(प्रतिनिधी)

नंदुरबार, 23 सप्टेंबर : विधानसभा निवडणुकीच्यां तोंडावर नंदुरबार जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेसला मोठ भगदाड पडण्याची शक्यता वर्तवल्या जात आहे. राष्ट्रवादीचे जिल्हाध्यत्र राजेंद्र गावित यांनी आज शहादा इथे कार्यकर्ता मेळावा घेत तिकीट न मिळाल्यास ज्या पक्षातून तिकीट मिळेल त्यात जाण्याचा इशारा दिला आहे. गेल्या विधानसभा निवडणुकांमध्ये राजेंद्र गावित यांनी शहादा-तळोदा मतदारसंघातून राष्ट्रवादीकडून निवडणूक लढवली होती.

नंदुरबारमधील चारही विधानसभा क्षेत्र आघाडीच्या वाटाघाटीत काँग्रेसला सुटण्याची शक्यता वर्तवल्या जात आहे. सध्या नंदुरबार जिल्ह्यातील दोन मतदारसंघात काँग्रेसचे आमदार आहेत. मात्र, राष्ट्रवादीच्या जिल्हाध्यक्ष राजेंद्र गावित यांनी ज्या शहादा-तळोदा मतदारसंघातून गेल्या वेळेस निवडणूक लढवली होती. त्या मतदारसंघात काँग्रेस राष्ट्रवादीचे मत विभाजन होऊन भाजप विजयी झाली होती. दुसऱ्या क्रमांकावर राहिलेल्या काँग्रेसच्या पदमाकर वळवी यांचा 719 मतांनी पराभव झाला होता. तर तिसऱ्या क्रमांकावर राहिलेल्या राजेंद्र गावित यांनादेखील विजयी उमेदवारांपेक्षा 11590 मतं कमी मिळाली होती. अशातच दुसऱ्या क्रमांकावर याठिकाणी काँग्रेस उमेदवार राहिल्याने हा मतदारसंघ काँग्रेसला सुटण्याची शक्यता आहे.

तर अशीच काहीशी परिस्थीती नवापूरबाबतीत पण दिसून येणार आहे. याठिकाणी काँग्रेसचे विद्यमान आमदार सुरुपिसिंग नाईक असले तरी राष्ट्रवादीचे नेते तथा माजी आमदार शरद गावित यांनीदेखील हा मतदारसंघ राष्ट्रवादीला सुटण्याची मागणी केली आहे. याच मतदारसंघाच्या जागा वाटपावरून गेल्या विधानसभा निवडणुकीत आघाडीत मोठा तिढादेखील निर्माण झाला होता. त्यामुळे हा मतदारसंघ काँग्रेसला सुटल्यास शरदा गावितांची बंडखोरीदेखील अटळ मानली जात आहे.

अक्कलकुवा मतदारंसघातून काँग्रेसचे विद्यमान आमदार के.सी पाडवी असल्याने हा मतदारसंघ काँग्रेसच्या ताब्यातच राहणार आहे. तर जे राष्ट्रवादी काँग्रेसेचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र गावित आणि नवापूरचे नेत शरद गावित राष्ट्रवादीसाठी मतदारसंघ सुटण्याची मागणी करत आहेत. ते मात्र, नंदुरबार विधानसभा मतदारसंघातून लढण्यास तयार नाही. कारण, याठिकाणी या दोघांचेही मोठे बंधू असलेले विजयकुमार गावित हे भाजपाचे विद्यमान आमदार आहेत. काँग्रेसने हा मतदारसंघ राष्ट्रवादीला सोडण्याची तयारी दाखवली आहेत. मात्र, पारिवारीक वाद टाळण्यासाठी राष्ट्रवादीदेखील लढण्यास तयार नाही. अशा परिस्थीतीमध्येच आज राजेंद्र गावितांनी कार्यकर्ता मेळावा घेत. पक्ष सोडण्याचे सूचक संकेतदेखील दिले आहे.

जो पक्ष आपली काळजी घेईल, आपल्याला तिकीट देईल त्या पक्षात प्रवेश करणार असल्याचं त्यांनी आज कार्यकर्ता मेळाव्यात बोलून दाखवल्याने आजच्या या त्यांच्या भुमिकेनंतर राजेंद्र गावित आणि शरद गावित यांची काँग्रेस विरोधात उमेदवारी अटळ मानल्या जात आहे.

इतर बातम्या - राष्ट्रवादीत आऊटगोईंग बंद इनकमिंग सुरू, अनेकांनी धरला पवारांचा हात!

एकीकडे नंदुरबारमध्ये राष्ट्रवादीला भगदाड पडण्याची शक्यता आहे तर दुसरीकडे अकोल्यामध्ये राष्ट्रवादीत जोरदार इनकमिंग सुरू आहे. सत्ताधारी भाजपला अकोल्यामध्ये सगळ्यात मोठा धक्का बसला आहे. अजित पवार यांच्या उपस्थितीत अनेकांनी राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केला असल्याची माहिती देण्यात आली आहे. भाजप जिल्हा परिषद सदस्य किरण लहामटे, सुनीता भांगरे यासह अनेक कार्यकर्ते राष्ट्रवादीमध्ये गेले आहेत. पिचड यांच्या विरोधात एकास एक लढत देण्यासाठी राष्ट्रवादी सरसावली आहे. त्यामुळे ऐन निवडणुकांच्या तोंडावर भाजपसाठी ही धोक्याची घंडा आहे.

मधुकर पिचड यांच्या भाजपा प्रवेशानंतर आज त्यांच्या बालेकिल्ल्यात अजित पवार यांची सभा होणार आहे. पिचडांच्या पराभवासाठी एकास एक उमेदवार देऊन ही लढाई होण्याची चिन्हं आहेत. आज अजित पवार यांच्या उपस्थितीत अकोले भाजपाचे जिल्हा परिषद सदस्य किरण लहामटे आणी सुनिता भांगरे यांच्यासह अनेकांनी राष्ट्रवादीत प्रवेश केल्याने पिचडांसह भाजपाला मोठा धक्का बसला आहे.

इतर बातम्या - युतीच्या चर्चेवर भाजपचा हट्टीपणा कायम, शिवसेनेचा 'हा' फॉर्म्युला अमान्यच!

अहमदनगर जिल्ह्यातील अकोले इथे आज अजित पवार यांच्या उपस्थितीत मेळावा पार पडला आहे. जेष्ठ नेते मधुकर पिचड यांचा मतदारसंघात असलेल्या अकोलेत आज अजित पवारांची तोफ धडाडणार आहे. पिचडांच्या भाजपा प्रवेशानंतर अजित पवार आज काय बोलणार याकडे सर्वांचे लक्ष लागलं आहे. दरम्यान, या मेळाव्यात पिचडांचे पारंपारिक विरोधक असलेले अशोक भांगरे आणी जिल्हा परीषद सदस्य सुनिता भांगरे आणि भाजपाचे जिल्हा परिषद सदस्य किरण लहामटे यांच्यासह अनेकांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करत पिचडांच्या पराभवाचा निर्धार केला आहे.

VIDEO: थोडी वाट बघा... मुख्यमंत्र्यांनी युतीच्या निर्णयाबाबत केलं आवाहन

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Sep 23, 2019 02:09 PM IST

ताज्या बातम्या