लढत विधानसभेची : राजापूरमधून शिवसेनेचे राजन साळवी हॅटट्रिक करणार का?

लढत विधानसभेची : राजापूरमधून शिवसेनेचे राजन साळवी हॅटट्रिक करणार का?

रत्नागिरीमधला राजापूर मतदारसंघ हा शिवसेनेचा गड मानला जातो. शिवसेनेचे राजन साळवी हे राजापूरचे विद्यमान आमदार आहेत. रत्नागिरी जिल्ह्यात शिवसेनेचं चांगलंच वर्चस्व आहे. त्यामुळे, यंदाही राजन साळवी यांचंच पारडं जड असल्याचे पाहायला मिळत आहे.

  • Share this:

रत्नागिरी, 20 सप्टेंबर : रत्नागिरीमधला राजापूर मतदारसंघ हा शिवसेनेचा गड मानला जातो. शिवसेनेचे राजन साळवी हे राजापूरचे विद्यमान आमदार आहेत. 2009 आणि 2014 च्या निवडणुकीत राजन साळवी या मतदारसंघातून निवडून आले आहेत. रत्नागिरी जिल्ह्यात शिवसेनेचं चांगलंच वर्चस्व आहे. त्यामुळे, यंदाही राजन साळवी यांचंच पारडं जड असल्याचे पाहायला मिळत आहे.

नाणार आणि जैतापूर हे दोन्ही वादग्रस्त प्रकल्प याच मतदारसंघात असल्याने हा मतदारसंघ राजकीयदृष्ट्या खूप महत्त्वाचा आहे. 2014 साली जैतापूर प्रकल्पाला शिवसेनेनं प्रखर विरोध केला होता. त्यानंतर राजन साळवी मोठ्या मताधिक्यानं निवडून आले. नाणार प्रकल्पालाही सेनेनं कडाडून विरोध केला आहे. मात्र आता 2014 सारखी परिस्थिती नाही. जैतापूर प्रकल्पाला सगळ्याच स्थानिकांचा विरोध होता. पण यावेळी परिस्थिती वेगळी आहे.

लढत विधानसभेची : मलबार हिलमध्ये मंगलप्रभात लोढांचं वर्चस्व कायम राहणार का ?

नाणार प्रकल्पावरून स्थानिकांमध्ये फूट पडली. त्यामुळे यंदा मतदारसंघाचा पूर्ण पाठिंबा सेनेला मिळेलच, असं नाही. पण राजन साळवींचा छोट्याशा गावांमध्येही चांगला संपर्क आहे. याचा त्यांना फायदा होऊ शकतो.

यावेळी राजन साळवींनाच युतीची उमेदवारी मिळण्याची दाट शक्यता आहे. राजापूरमध्ये काँग्रेस आणि राष्ट्रवादीचा कोणीही मोठा चेहरा नाही. त्यामुळे तगडा विरोधक नसणं हे सेनेच्या पथ्यावर पडू शकेल.

Loading...

2014 च्या विधानसभा निवडणुकीतलं मतदान

राजन साळवी, शिवसेना –76 हजार 266

राजेंद्र देसाई, काँग्रेस - 37 हजार 204

अजित रमेश यशवंतराव, राष्ट्रवादी - 11 हजार 923

युतीचा फॉर्म्युला आधीच ठरला आहे, लवकरच कळवू- उद्धव ठाकरे

=====================================================================================

VIDEO : युतीचा फॉर्म्युला अजून हवेतच? चंद्रकांत पाटील म्हणाले...

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Sep 20, 2019 06:19 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...