राजू शेट्टींसाठी राज ठाकरे मैदानात, 'या' ठिकाणी होणार सभा

राजू शेट्टींसाठी राज ठाकरे मैदानात,  'या' ठिकाणी होणार सभा

लोकसभा निवडणुकीच्या मैदानात राज ठाकरे उतरले असून ते सहा सभा घेणार आहेत.

  • Share this:

कोल्हापूर, 5 एप्रिल : लोकसभा निवडणुक लढवणार नाही, असा निर्णय घेतल्यानंतर आता मात्र महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे आता नरेंद्र मोदी यांच्या विरोधात प्रचार करण्यासाठी मैदानात उतरणार आहे. याकरता राज ठाकरे कोल्हापुरात स्वाभिमानी पक्षाचे अध्यक्ष आणि खासदार राजू शेट्टी यांच्या प्रचाराकरता सभा घेणार आहेत, अशी माहिती सुत्रांनी दिली आहे.

त्यामुळं पहिल्यांदाच राजू शेट्टी आणि राज ठकारे एकत्र येणार आहेत. 18 किंवा 19 तारखेला हातकणंगलेमध्ये सभा होण्याची शक्यता आहे. राजू शेट्टी यांचा स्वाभिमानी पक्ष महाआघाडीमधील घटक पक्ष असून राजू शेट्टी हातकणंगलेमधून आपली उमेदवारी जाहीर केली आहे.

लोकसभा निवडणूक न लढवण्याचा निर्णय घेतल्यानंतर देखील राज ठाकरे राज्यभरात सहा प्रचार सभा घेणार आहेत. दरम्यान, यापूर्वीच राज ठाकरे यांनी भाजपला मतदान करू नका असं आवाहन केलं आहे. 2014मध्ये राज ठाकरे यांनी नरेंद्र मोदी यांना समर्थन दिलं होतं. तर, आता पाच वर्षानंतर तेच राज ठाकरे मोदींना विरोध करताना दिसत आहे. राज्यातील सोलापूर, नांदेड आणि मावळसह सहा ठिकाणी राज ठाकरेंच्या सभा होणार आहेत. मात्र, या सभांमध्ये काँग्रेस किंवा राष्ट्रवादीचे उमेदवार हे व्यासपीठावर असणार नाहीत अशी माहिती देखील समोर येत आहे. दरम्यान, मुंबईतील काँग्रेसच्या उमेदवार उर्मिला मातोंडकर यांच्यासाठी राज ठाकरे सभा घेणार अशी चर्चा होती. पण, आता उर्मिला मातोंडकर यांच्यासाठी देखील राज ठाकरे सभा घेणार नसल्याची माहिती कळतेय.

ये है 'राज'निती

राज ठाकरेंच्या या सभेमध्ये सोलापूर, नांदेड आणि मावळचा समावेश आहे. सोलापुरातून माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे हे मैदानात आहेत. त्यांना वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांचं आव्हान आहे. तर,नांदेडमधून माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण आणि मावळमधून अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार हे लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात आहेत. पार्थ यांच्यासमोर शिवसेनेच्या श्रीरंग बारणे यांचं आव्हान हे पार्थ यांना आहे. त्यामुळे या लढतींकडे देखील राज्यासह देशाचं लक्ष लागून राहिलं आहे. त्यामुळे राज यांच्या मोदी विरोधाचा फायदा हा आघाडीला होणार का? हे पाहावं लागणार आहे.

SPECIAL REPORT: खासदार विनायक राऊत म्हणतात, '4 वर्षातील चुका पदरात घ्या'

First published: April 5, 2019, 10:54 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading