फेरीवाल्यांवर कारवाई कधी?-राज ठाकरेंचा केडीएमसी आयुक्तांना सवाल

फेरीवाल्यांवर कारवाई कधी?-राज ठाकरेंचा केडीएमसी आयुक्तांना सवाल

मनसेच्या नगरसेवकांच्या मागण्या पूर्ण केल्या जात नाहीत अशा आरोप होत आहेत. यासंदर्भात ते आयुक्त वेलरासू यांच्याशी चर्चा केली आहे.

  • Share this:

कल्याण,28 ऑक्टोबर:मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचे आयुक्त पी. वेलरसू यांची भेट घेतली.त्यांच्याशी विविध विषयांवर त्यांनी चर्चा केली

मुंबईप्रमाणेच कल्याण आणि डोंबिवलीमधल्या फेरीवाल्यांवर कारवाई का होत नाही, असं म्हणत राज यांनी आयुक्तांना फैलावर घेतलं. रेल्वेची हद्द कुठे संपते आणि पालिकेची कुठे सुरू होते, ते एकदा निश्चित करा, आणि कारवाई सुरू करा. शहर स्वच्छ दिसलं पाहिजे, असं राज ठाकरेंनी आयुक्तांना खडसावलं.मनसे अध्यक्ष राज ठाकरे सध्या कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या दौऱ्यावर आहेत. मनसेच्या संघटनाची पाहणी करण्यासाठी राज ठाकरे या दौऱ्यावर गेले आहेत.राज ठाकरे येण्याच्या आधल्या मध्यरात्री केडीएमसीच्या महापौरांनी रस्त्यातील खड्डे दुरुस्तीची पाहणी केली. राज ठाकरे यांनी आज डोंबिवलीतीलप्रसिद्ध गणेश मंदिरात जाऊन दर्शन घेतलं. त्यानंतर आज केडीएमसी आयुक्त पी. वेलरासू यांची राज ठाकरे भेट घेतली. मनसेच्या नगरसेवकांच्या मागण्या पूर्ण केल्या जात नाहीत अशा आरोप होत आहेत. यासंदर्भात ते आयुक्त वेलरासू यांच्याशी चर्चा केली आहे. आता कल्याणमध्ये मनसे पदाधिकाऱ्यांची बैठक होणार आहे. यात पक्षसंघटनेबाबत चर्चा करण्यात येणार आहे. काल झालेल्या नगरसेवकांच्या बैठकीत नगरसेवकांनी कामं होत नसल्याची तक्रार केली होती.

या बैठकीत राज ठाकरेंनी खडसावल्यामुळे आतातरी केडीएमसी काही कारवाई करते का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Oct 28, 2017 10:48 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading