आमच्या पोरांची वाट का लावली- राज ठाकरेंचा गिरीश बापटांना सवाल

आमच्या पोरांची वाट का लावली- राज ठाकरेंचा गिरीश बापटांना सवाल

काही दिवसांपूर्वी पुण्यातील मनसे कार्यकर्त्यांना अटक करण्यात आली होती.पुण्यातील मनसे कार्यकर्त्यांना अटक केल्याबद्दल राज ठाकरे यांनी नाराजी व्यक्त केली. कलम 395 या कार्यकर्त्यांवर लावण्यात आलं आहे.

  • Share this:

नाशिक,10 नोव्हेंबर: पुण्यामध्ये मनसैनिकांची वाट का लावली असा सवाल मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी पालकमंत्री गिरीश बापटांना विचारला आहे. सध्या राज ठाकरे नाशिकच्या दौऱ्यावर असून तिथेच त्यांची आणि राज ठाकरेंची भेट घेतली आहे.

काही दिवसांपूर्वी पुण्यातील मनसे कार्यकर्त्यांना अटक करण्यात आली होती.पुण्यातील मनसे कार्यकर्त्यांना अटक केल्याबद्दल राज ठाकरे यांनी नाराजी व्यक्त केली. कलम 395 या कार्यकर्त्यांवर लावण्यात आलं आहे. या विषयावर दोघांनी दहा मिनिटं चर्चाही केली. सध्या कायद्याला त्याचं काम करू द्या पुढे सहकार्य करू असं आश्वासन गिरीश बापटांनी राज ठाकरेंना दिलं आहे. पुरवठा खात्याच्या तक्रार सुनावणीसाठी गिरीश बापट  नाशकात आले आहेत. गोल्फ क्लब रेस्ट हाऊस मध्ये राज ठाकरे आणि गिरीश बापट यांची भेट झाली.

आज सिन्नरमध्ये राज ठाकरे समृद्धी प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांची भेटही घेणार आहेत. तसंच नाशिकमधील पदाधिकाऱ्यांनाही ते भेटत  आहेत.

First published: November 10, 2017, 1:38 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading