Home /News /maharashtra /

राज ठाकरे घेणार अण्णांची भेट, मागण्यांना मनसेचा पाठिंबा!

राज ठाकरे घेणार अण्णांची भेट, मागण्यांना मनसेचा पाठिंबा!

अण्णांच्या आंदोलनाचा फायदा घेण्यासाठी आता विविध पक्षांच्या नेत्यांची राळेगणला गर्दी होत आहे.

    राळेगण, 03 फेब्रुवारी : ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्या उपोषणाचा रविवारी पाचवा दिवस होता. अण्णांचं वय 82 वर्षांचं असून गेल्या पाच दिवसांमध्ये त्यांचं 4 किलो वजन कमी झालं आहे. अण्णांच्या मागणींच्या समर्थनासाठी राळेगणचे ग्रामस्थही आता रस्त्यावर उतरले आहेत. अण्णांना पाठिंबा देण्यासाठी मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे सोमवारी राळेगणमध्ये जाऊन अण्णांची भेट घेणार आहेत. सरकारच्या वतीने जलसंपदामंत्री  गिरीश महाजन यांनी आज अण्णांची भेट घेतली.  अण्णांच्या सर्व मागण्यांशी सरकार सहमत असून सकारात्मक चर्चा झाल्याचा दावा महाजन यांनी केला आहे. अण्णांनी उपोषण सोडावं असं आवाहनही त्यांनी केलं. लोकपालाची नियुक्ती, प्रत्येक राज्यात लोकायुक्त आणि शेतकऱ्यांच्या मागण्यांवर तातडीने निर्णय घ्या या मागण्यांसाठी अण्णा हजारे गेल्या पाच दिवसांपासून उपोषणाला बसले आहेत. अण्णांशी चर्चा झाल्यानंतर गिरीश महाजन यांनी चर्चा सकारात्मक झाल्याचा दावा केलाय. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी फोनवरून अण्णांशी चर्चा केली आहे. तेही मागण्यांबाबत सकारात्मक असल्याचं महाजन यांनी सांगितलं. लोकपाला संदर्भातल्या 1972 च्या कायद्यामध्ये बदल करण्याची मागणी अण्णांनी केली होती. सरकारला ही मागणी मान्य असून नवा कायदा तयार करण्यासाठी ड्राफ्टिंग कमेटी स्थापन करण्याचही सरकारने मान्य केलंय. सोमवारी त्याबाबतचं पत्र घेऊन महाजन पुन्हा राळेगणसिद्धी येणार आहेत. गिरीश महाजनांच्या पाठोपाठ राधाकृष्ण विखे पाटलांनी देखिल अण्णांची भेट घेतलीय.
    First published:

    Tags: Anna hazare, Raj Thackery, अण्णा हजारे, लोकपाल

    पुढील बातम्या