नरेंद्र मोदी आणि अमित शहा हे देशावरचं संकट; राज ठाकरेंचा हल्लाबोल

नरेंद्र मोदी आणि अमित शहा हे देशावरचं संकट; राज ठाकरेंचा हल्लाबोल

'लोकसभा हे आपलं उद्दीष्ट नाही तर विधानसभेच्या निवडणुकीसाठी कार्यकर्त्यांनी कामाला लागावं.'

  • Share this:

मुंबई 19 मार्च : लोकसभेच्या 2019 च्या निवडणुका लढवणार नाही अशी घोषणा केल्यानंतर मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज आपल्या भूमिकेचा खुलासा केला. मला कधीच लोकसभेची निवडणूक लढवायची नव्हती. देश सध्या एका संकटातून जातोय. नरेंद्र मोदी आणि अमित शहा हे देशावरचं संकट असून ते दूर झालं पाहिजे यासाठीच प्रचार करणार असल्याचं राज ठाकरे यांनी सांगितलं. ही निवडणूक कुठल्या पक्षांची नाही तर मोदी,शहांविरूद्ध आहे असंही ते म्हणाले. मनसेच्या सर्व कार्यकर्त्यांनी मोदी आणि शहांच्या विरूद्ध काम करावे असं आवाहनही त्यांनी केलं.

कार्यकर्त्यांनी नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांच्या विरोधात प्रचार करावा. त्याचा ज्या पक्षांना फायदा व्हायचा त्यांना होऊ द्या. मोदी आणि शहा राजकीय पटलावरून दूर गेल्याशिवाय राजकारणाचं भलं होणार नाही असंही त्यांनी सांगितलं. मोदींसारखा खोटारडा पंतप्रधान आपण पाहिला नाही असंही ते म्हणाले.

राज ठाकरे हे बारामतीची स्क्रिप्ट वाचतात अशी टीका मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली होती. त्याला उत्तर देताना राज ठाकरे यांनी भाषणादरम्यान मोदींनी पवारांची जी स्तुती केली होती त्याच्या काही व्हिडीओ क्लिप ऐकवल्या. आता मुख्यमंत्री उत्तर देतील का? असा सवालही त्यांनी केला.

काय म्हणाले राज ठाकरे?

मी गेल्या गुढीपाडवा मेळाव्यात देशातील सर्व विरोधी पक्षांनी एकत्र यावे अशी भुमिका व्यक्त केली होती.

सगळ्या विरोधकांनी एकत्र येण्याची घोषणा केल्यानंतर मला डर कशाचा.

मला भेटण्यासाठी अशोक चव्हाणांचा फोन आला आणि आम्ही भेटलो.

मी जे करीन ते तुमच्या फायद्याचे असेल असे मी अशोक चव्हाणांना सांगितले.

आजची निवडणूक मोदी आणि शहा विरोधात सगळे अशी आहे.

या पुढे मी ज्या काही सभा घेईल त्या सभा नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांच्या विरोधात असेल.

देशाच्या पंतप्रधानांविचार मोठा असायला हवा, पण हे काय सांगतो, मी चौकीदार आहे.

याच्यापुढे मी आणि तुम्ही जे काही करणार ते मोदी आणि भाजपाच्या विरोधात करायचे.

आज देश एका मोठ्या संकटात सापडलाय त्यातून सोडवायचे आहे.

तुमच्याकडे अनेक लोक थैल्या रिकामे करायला(पैसे वाटायला) येतील रिकाम्या करा.

भाजपाचे अनेक लोक माझ्यासोबत बोलत असतात.

जेव्हा मोदी, शहा राजकीय क्षितिजावरून बाहेर जातील तेव्हाच खरी निवडणूक असेल

का सोडलं राज ठकरेंनी युद्धाचं मैदान

करिष्मा, आक्रमकपणा, वक्तृत्व आणि खंबीर नेतृत्व राजाकरणात आवश्यक असणारे हे  सर्व गुण राज ठाकरे यांच्याकडे असतानाही मनसे दिवसेंदिवस आपला पाठिंबा गमावत चालल्याचं दिसचं आहे. राज ठाकरे यांच्या धरसोड वृत्तीमुळेच मनसेची ही स्थिती झाल्याचं मत दैनिक लोकमतचे वरिष्ठ सहाय्यक संपादक यदू जोशी यांनी व्यक्त केलंय.

यदू जोशी म्हणाले, राज ठाकरेंनी 2014 ची निवडणुकही लढवली नाही. मनसेची नाशिक आणि पुणे महापालिकेची सत्ता गेली. मुंबईत जे त्यांचे 6 नगरसेवक होते त्यातले बहुतांश नगरसेवक पक्ष सोडून गेले. मनसेचे जुन्नरचे एकमेव आमदार असलेले शरद सोनवणे यांनीही नुकताच शिवसेनेत प्रवेश केला. त्यामुळे मनसेचं मनसेचं विधानसभेतलं उरलं सुरलं प्रतिनिधीत्वही गेलं आहे.

राज ठाकरे यांच्या धरसोड वृत्तीमुळेच मनसेची ही अवस्था झाली. लोकसभेसाठी कार्यकर्त्यांचं जे नेटवर्क पाहिजे ते नेटवर्क आज मनसेकडे नाही त्यामुळे त्यांनी निवडणुक न लढविण्याचा निर्णय घेतला असावा असं मतही जोशी यांनी व्यक्त केलं. 2014 मध्ये त्यांनी नरेंद्र मोदींना पाठिंबा दिला. नंतर त्यांच्यावर प्रहार करायला सुरूवात केली. शरद पवारांवर नेहमी टीका करणाऱ्या राज ठाकरेंनी पवारांची मुलाखत घेतल्यानंतर मैत्रीचं पर्व सुरू केलं. यामुळे कार्यकर्ते गोंधळात पडतात.

भाषणांसाठी राज ठाकरेंच्या भाषणाला गर्दी होते मात्र मत का मिळत नाहीत यावर जोशी म्हणाले, लोक राज ठाकरे को सुनने आते है, राज ठाकरे की नही सुनते.

First Published: Mar 19, 2019 07:21 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading