मुंबई, 25 जानेवारी : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांचे सुपुत्र अमित ठाकरे हे येत्या 27 जानेवारीला विवाहबंधनात अडकणार आहेत. मिताली संजय बोरूडे हिच्याशी त्यांचा विवाह होणार आहे. या विवाह सोहळ्यात अनेक दिग्गज राजकीय नेते सहभागी होणार आहेत. तसेच मराठी हिंदी सिनेसृष्टीतील कलाकार, ज्येष्ठ उद्योगपती, सामाजिक कार्यकर्ते असं भलं मोठं वऱ्हाड या लग्न सोहळ्याला उपस्थित राहणार आहेत.