मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

मनसेच्या राज्यातल्या एकमेव नगरपरिषदेवर फडकला नवा झेंडा

मनसेच्या राज्यातल्या एकमेव नगरपरिषदेवर फडकला नवा झेंडा

कार्यकर्त्यांनी यावेळी हिंदुहृदयसम्राट म्हणून राज ठाकरेंच्या नावाच्या घोषणा दिल्या.

कार्यकर्त्यांनी यावेळी हिंदुहृदयसम्राट म्हणून राज ठाकरेंच्या नावाच्या घोषणा दिल्या.

कार्यकर्त्यांनी यावेळी हिंदुहृदयसम्राट म्हणून राज ठाकरेंच्या नावाच्या घोषणा दिल्या.

  • Published by:  Akshay Shitole

दिनेश केळुसकर, खेड, 25 जानेवारी : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा नवा झेंडा मनसेची राज्यातली पहिली आणि सध्याची एकमेव असलेल्या खेड नगरपरिषदेवर फडकला आहे . मनसेचे खेडचे नगराध्यक्ष वैभव खेडेकर यांच्यासह मनसेच्या कार्यकर्त्यांनी हा नवा झेंडा फडकावत जल्लोष केला. विशेष म्हणजे कार्यकर्त्यांनी यावेळी हिंदुहृदयसम्राट म्हणून राज ठाकरेंच्या नावाच्या घोषणा दिल्या.

राज ठाकरे यांनी 23 जानेवारीला मुंबईत पक्षाचं अधिवेशन बोलावलं होतं. या अधिवेशनात मनसेनं आपला झेंडा बदलला. आधी चौरंगी असलेला मनसेचा झेंडा आता फक्त भगव्या रंगात दिसणार आहे. तसंच या झेंड्याच्या मध्यमागी छत्रपती शिवाजी महाराज यांची राजमुद्राही पाहायला मिळत आहे. मनसेच्या कार्यकर्त्यांनी या नव्या झेंड्याचा उत्साहाने स्वागत केलं. याचंच प्रतिबिंब खेड नगरपरिषदेवरही पाहायला मिळालं.

नवा झेंडा...नवा अजेंडा!

राज ठाकरे यांच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं मराठीच्या मुद्द्यानंतर आता हिंदुत्त्वाकडे मोर्चा वळवला आहे. नुकत्याच झालेल्या महाअधिवेशानात राज ठाकरे यांनी नव्या झेंड्याचं अनावरण केलं. मनसेची सुरुवात करताना जो झेंडा माझ्या मनात होता तोच हा झेंडा आहे असा खुलासा त्यांनी केला. गेली अनेक दिवस या झेंड्याची चर्चा सुरू होती.

'सत्य बाहेर येण्याच्या भीतीमुळे NIA कडे तपास', शरद पवारांचा मोदी सरकारवर हल्लाबोल

तसंच जमलेल्या माझ्या तमाम हिंदू बंधू, भगिणी आणि मातांनो, अशी भाषणाची सुरुवात करत आपली पुढील राजकीय दिशा हिंदुत्त्वाच्या मार्गाने जाणार असल्याचे संकेत दिले. 'मी मराठी देखील आहे आणि मी हिंदू देखील आहे... मी धर्मांतर केलेलं नाही. पण एक सांगतो माझ्या मराठीला नख लावायचा प्रयत्न केला तर मराठी म्हणून त्याच्या अंगावर जाईन आणि माझ्या धर्माला नख लावायचा प्रयत्न झाला तर हिंदू म्हणून त्याच्या अंगावर जाईन,' असं राज ठाकरे म्हणाले.

First published:

Tags: MNS, Raj thackarey