CM फडणविसांविरोधात मनसे मैदानात, उमेदवार यादी जाहीर करण्याआधीच जहरी टीका

CM फडणविसांविरोधात मनसे मैदानात, उमेदवार यादी जाहीर करण्याआधीच जहरी टीका

मतदारसंघांचा आढावा घेण्यासाठी मनसेचे प्रभारी वेगवेगळ्या भागात गेले आहेत.

  • Share this:

मुंबई, 23 सप्टेंबर : राज ठाकरे यांची महाराष्ट्र नवनिर्माण सेना यंदाची विधानसभा निवडणूक लढवणार असल्याचं निश्चित झालं आहे. महाराष्ट्रातील सर्वच्या सर्व विभागात मनसे आपले उमेदवार उभे करणार आहे. मतदारसंघांचा आढावा घेण्यासाठी मनसेचे प्रभारी वेगवेगळ्या भागात गेले आहेत.

विधानसभा निवडणुकीची लढाई प्रत्यक्ष मैदानासोबतच सोशल मीडियातूनही लढली जाणार आहे. सोशल मीडियावर सत्ताधारी भाजपने मोठी ताकद लावली आहे. याला आता मनसेकडूनही जोरदार उत्तर देण्यात आलं आहे. एका व्यंगचित्राच्या माध्यमातून मनसेनं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधला आहे. 'राजभाषेच्या चाहुलीने सत्ताधारी थबकले, फक्त बातमीनेच थापाड्यांचे पाय लटलटले,' असं ट्वीट मनसेनं केलं आहे.

मनसे मैदानात, उमेदवार यादी शतक पार करणार

मनसेच्या उमेदवारांचा आकडा शंभरी पार करणार आहे. मनसेची एकूण 122 जागांची तयार झाल्याची माहिती आहे. मुंबई, ठाणे आणि नाशिकमध्ये मनसे सर्वच जागा लढणार आहे.

कुठे किती जागा लढणार?

मुंबईत 36 पैकी 36 जागा

ठाणे 24 पैकी 24

नाशिक 15 पैकी 15

मराठवाडा 42 पैकी 22

विदर्भ 62 पैकी 15

कोकण 15 पैकी 10

उत्तर महाराष्ट्र - चाचपणी सुरू

VIDEO: थोडी वाट बघा... मुख्यमंत्र्यांनी युतीच्या निर्णयाबाबत केलं आवाहन

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Sep 23, 2019 04:21 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading