• Home
 • »
 • News
 • »
 • maharashtra
 • »
 • 'राज ठाकरे काँग्रेससोबत गेले तर मनसेचं मोठं नुकसान'

'राज ठाकरे काँग्रेससोबत गेले तर मनसेचं मोठं नुकसान'

'मनसेने काँग्रेसच राष्ट्रवादीचा प्रचार केला, आधी अप्रत्यक्ष मतं मागितली होती, आता थेट मतं मागतील.'

 • Share this:
  मुंबई 9 जुलै : मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सोनिया गांधींच्या घेतलेल्या भेटीवर आता राजकीय प्रतिक्रिया येत आहेत. अर्थमंत्री आणि भाजपचे ज्येष्ठ नेते सुधीर मुनगंटीवार यांनी राज ठाकरे यांना सावधान राहण्याचा सल्ला दिलाय. राज ठाकरे हे काँग्रेससोबत गेले तर त्यांच्याकडे राहिलेले मतदारही त्यांच्याकडून दुरावतील असं मत मुनगंटीवार यांनी व्यक्त केलं. मनसेने काँग्रेसच राष्ट्रवादीचा प्रचार केला, आधी अप्रत्यक्ष मतं मागितली होती, आता थेट मतं मागतील. मनसे काँग्रेस सोबत गेला तर अजून नुकसान आहे असंही त्यांनी सांगितलं. काँग्रेसची जनमानसातली प्रतिष्ठा संपली आहे. त्यांची विश्वसनियता राहिली नाही त्यामुळे मनसे काँग्रेससोबत गेली तरीही काहीही फरक पडणार नाही असंही ते म्हणाले.

  कर्नाटकातील राजकीय ड्रामा; विधानसभा अध्यक्षांकडून 14 आमदारांचे राजीनामे नामंजूर

  मुंबई काँग्रेसची दयनीय अवस्था झाली आहे. त्यामुळे त्यांची मानसिकता पराभूतांची झाली. राजीनामा द्यायचं कारणच नव्हते, यश अपयश हे चालत राहतं, काँग्रेसला सत्तेची चटक लागली, त्यांना सत्ता विरह सहन करता येत नाही. लोकशाहीसाठी विरोधी पक्ष चांगला असला पाहिजे. काँग्रेस  जिवंत राहीली पाहिजे ही आमची इच्छा आहे असंही मुनगंटीवार म्हणाले. अशी झाली राज ठाकरे सोनिया गांधी भेट नवी दिल्लीत असलेले मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज काँग्रेसच्या नेत्या सोनिया गांधी यांची भेट घेतली. राज हे सोनिया गांधी यांच्या निवासस्थानी गेले आणि त्यांनी सोनिया गांधींशी विविध विषयांवर चर्चा केली. ही भेट अर्ध्या तास चालली. महाराष्ट्राच्या राजकारणातली ही मोठी घटना समजली जाते. EVM मशिन संदर्भात ही भेट असल्याचं सांगितलं जात असलं तर विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीने हे नव्या समीकरणाचे संकेत असल्याचं मानलं जातंय. राहुल गांधी हे या भेटीच्यावेळी उपस्थित नव्हते अशीही माहिती आहे.

  VIDEO: फेसबुक प्रेम पडलं महागात; ग्रामस्थांनी दहशतवादी समजून दिला चोप

  महाराष्ट्रात काँग्रेसचे स्थानिक नेते हे मनसेला आघाडीत घेण्याच्या बाजूने फारसे इच्छुक नाहीत. पण आता राज आणि सोनियांच्या भेटीमुळे ही समिकरणं बदलण्याची शक्यता आहे. EVMसोबतच या भेटीत राजकीय विषयांवरही चर्चा झाल्याची माहिती सूत्रांनी दिलीय. या आधी राज ठाकरे यांनी मुख्य निवडणूक आयुक्तांची भेट घेऊन त्यांना EVM बाबतचा संशय दूर करण्याची विनंती केली होती. मात्र निवडणूक आयोग फार काही करेल असं नाही अशी प्रतिक्रिया राज ठाकरे यांनी व्यक्त केली होती.
  Published by:Ajay Kautikwar
  First published: