Home /News /maharashtra /

''अन् तेव्हा माझे हात-पाय थंड पडतात...'' अखेर राज ठाकरेंनी केला मोठा खुलासा

''अन् तेव्हा माझे हात-पाय थंड पडतात...'' अखेर राज ठाकरेंनी केला मोठा खुलासा

राज ठाकरे (Raj Thackeray) यांचं भाषण हे एक आकर्षणाचा केंद्रबिंदू असतो. राज ठाकरे यांच्या सभेपूर्वी ते काय बोलणार याकडे सर्वांचं लक्ष लागून राहिलेलं असतं. मात्र याबाबत राज ठाकरेंनी एक खुलासा केला आहे.

    मुंबई, 30 एप्रिल: मनसे अध्यक्ष राज ठाकरे (MNS president Raj Thackeray) यांची उद्या औरंगाबाद (Aurangabad) येथे सभा होणार आहे. राज ठाकरेंच्या (Raj Thackeray) भाषणाची शैली प्रत्येकालाच भावते. त्यांचा भाषण नेहमीच चर्चेचा विषय ठरतो. त्यांच्या कार्यकर्त्यांसाठीच नाही तर सर्वसामान्यांसाठीही त्यांचं भाषण हे एक आकर्षणाचा केंद्रबिंदू असतो. राज ठाकरे यांच्या सभेपूर्वी ते काय बोलणार याकडे सर्वांचं लक्ष लागून राहिलेलं असतं. राज ठाकरे यांचं भाषण नेहमीच वेगळं ठरतं. सभेतल्या भाषणादरम्यान एखाद्याची नक्कल करणं हे देखील आकर्षण ठरतं. मात्र सभेतल्या भाषणाची राज ठाकरे कशी तयारी करत असतील असा प्रश्न सर्वांनाच पडत असेल. तर याचाच खुलासा राज ठाकरेंनी केला आहे. एबीपी माझाच्या ‘माझा कट्टा’ या कार्यक्रमात बोलताना त्यांनी हा खुलासा केलाय. लग्नाच्या DJ तला थरार! नाचण्याच्या वादातून तरुणाचा अल्पवयीन मुलाकडून खून  मोठ्या कार्यक्रमात भाषण करण्यापूर्वी हातपायाला घाम फुटत असल्याची कबुली राज ठाकरेंनी दिली आहे. तसंच सभेच्या आधी माझे हात-पाय थंड पडतात आणि मी नेमकं काय बोलणार आहे, हे मलाच माहीत नसतं, असंही राज ठाकरे म्हणाले आहेत. राज ठाकरेंनी या गोष्टीचा खुलासा करताच पत्नी शर्मिला ठाकरे म्हणाल्या की, त्यांची सभा असते तेव्हा आम्ही कोणीच त्यांच्या खोलीत जात नाही. तसंच त्यांच्या भाषणाच्या दिवशी त्यांच्या खोलीत मी कोणाला जाऊ देत नाही. ते आपल्या भाषणाची तयारी करत असतात, असंही त्यांनी सांगितलं आहे. माझं वाचन खूपः राज ठाकरे आपलं वाचनही खूप असल्याचं राज ठाकरेंनी या कार्यक्रमात सांगितलं. तसंच सभेतील भाषणांमधले मुद्दे आपण काढतो. डोक्यातही अनेक विषय असतात. मात्र ऐनवेळेस आपण काय बोलणार आहोत हे मलाच माहित नसतं. इतकंच काय तर आपल्याला समोर कोण आहे हे देखील दिसत नसल्याचं राज ठाकरेंनी सांगितलं.
    Published by:Pooja Vichare
    First published:

    Tags: MNS, Raj Thackeray (Politician)

    पुढील बातम्या