बांगलादेशी घुसखोरांबाबत खबर दिल्यास मनसेकडून 5000चं इनाम, माहितीसाठी लावला स्टॉल

बांगलादेशी घुसखोरांबाबत खबर दिल्यास मनसेकडून 5000चं इनाम, माहितीसाठी लावला स्टॉल

बांग्लादेशी घुसखोरांना देशातून हुसकावून लावण्यासाठी मनसे जोरदार प्रयत्न करताना दिसत आहे. ‘घुसरखोरांची माहिती देणाऱ्यांना बक्षीस देणार’ अशी घोषणाच आता औरंगाबाद मनसेकडून करण्यात आली आहे.

  • Share this:

औरंगाबाद, 27 फेब्रुवारी :  गेल्या काही दिवसांमध्ये पाकिस्तान आणि बांगलादेशी घुसखोरांच्या विरोधातील भूमिका मनसेने वेळोवेळी मांडली आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मनसेच्या पहिल्यावहिल्या अधिवेशनामध्येच याबाबत भूमिका जाहीर केली होती. आता या घुसखोरांना देशातून पळवून लावण्यासाठी मनसे जोरदार प्रयत्न करताना दिसत आहे. ‘घुसरखोरांची माहिती देणाऱ्यांना बक्षीस देणार’ अशी घोषणाच आता मनसेकडून करण्यात आली आहे. औरंगाबाद मनसेने ही घोषणा केली आहे. घुसखोरांना पकडल्यास 5 हजार रुपये बक्षीस देणार असल्याची घोषणा औरंगाबाद मनसेने केली आहे.

कोणत्याही परिस्थितीत बांगलादेश आणि पाकिस्तानातील घुसखोरांना पळवून लावण्यासाठी मनसेने चंग बांधला आहे. या मोहिमेला गती देण्यासाठी मनसेने बक्षीस देण्याची शक्कल लढवली आहे. आकाशवाणी चौकात मनसेकडून एक स्टॉल उभारण्यात आला आहे. या स्टॉलवर गुप्तपणे घुसखोरांबाबत माहिती द्यायची आहे. याबाबत चौकशी केल्यानंतर घुसरखोरांची माहिती खरी आहे की खोटी याबाबत पडताळणी करण्यात येईल. दिलेली माहिती खरी निघाल्यास माहिती देणाऱ्यास 5 हजारांचं बक्षीस देण्यात येईल.माहिती देणाऱ्याचं नाव गुप्त ठेवण्याची खबरदारी मनसेकडून घेण्यात येणार असल्याचं सांगण्यात आलं आहे.

(हेही वाचा-मराठी दिनी राज ठाकरे यांनी शेअर केला काश्मिरी तरुणीचा VIDEO)

मुंबईमध्ये ठाण्यासह बोरिवली-विरारमध्ये मनसे कार्यकर्त्यांनी घुसखोरांना पकडलं होतं. पुण्यातही मनसेने घुसखोरांना पकडलं होतं. मात्र मनसेने पकडलेले घुसखोर नसून भारतीय असल्याचं काही दिवसातच उघड झालं होतं. याप्रकरणी मनसे कार्यकर्ते आणि इतर 8-9 जणांवर याप्रकरणी गुन्हे दाखल करण्यात आले होते.

(हेही वाचा-भगवानगडावर चोरी, बाबांच्या वापरातील रायफल गेली चोरीला)

दरम्यान राज ठाकरेंच्या नेतृत्वाखाली मनसेने बांगलादेशी आणि पाकिस्तानी घुसखोरांविरोधात मोर्चा काढला होता. मनसेच्या पहिल्या अधिवेशनातही त्यांनी याबाबत मनसेची कठोर भूमिका मांडली होती. अशावेळी औरंगाबाद मनसेकडून राबवण्यात आलेली ही मोहीम मनसेची भूमिका यशस्वी करण्यात हातभार लावेल का, हे पाहणं महत्त्वाचं ठरेल.

First published: February 27, 2020, 5:21 PM IST

ताज्या बातम्या