'गद्दारांची हकालपट्टी करणार', राज ठाकरेंनी दम दिल्यानंतर मनसेत पडली पहिली विकेट

'गद्दारांची हकालपट्टी करणार', राज ठाकरेंनी दम दिल्यानंतर मनसेत पडली पहिली विकेट

औरंगाबाद दौऱ्यावेळी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी कारवाईचे संकेत दिले होते.

  • Share this:

औरंगाबाद, 21 फेब्रुवारी : 'आपल्याच पक्षात काही लोक गद्दार आहेत. मीडियामध्ये चुकीच्या बातम्या देतात. या गद्दारांची नावं मला कळली असून त्यांची मी पक्षातून हकालपट्टी करणार आहे,' असं म्हणत औरंगाबाद दौऱ्यावेळी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी कारवाईचे संकेत दिले होते. त्यानंतर आता पक्ष विरोधी कारवाई केल्याने मनसे पदाधिकारी गौतम रामराव यांची जिल्हाध्यक्ष पदावरून हकालपट्टी करण्यात आली आहे. तसंच त्यांचं प्राथमिक सदस्यत्वही काढून घेण्यात आली.

राज ठाकरे पक्षाच्या संघटना बांधणीसाठी मैदानात उतरले असून त्यांनी सध्या औरंगाबादमध्ये काही दिवसांनी होणाऱ्या पालिका निवडणुकीवर लक्ष केंद्रित केलं आहे. काही दिवसांपूर्वी त्यांनी औरंगाबादचा दौराही केला. या दौऱ्यावेळीच त्यांनी पक्षांतील नेत्यांना इशारा दिला होता. 'मी पक्षाच्या बैठकीसाठी आलो आहे. आपल्याला जोरात काम करायचं आहे. पण काही लोक चुकीच्या बातम्या देतात. आपलेच कार्यकर्ते गद्दार आहेत. त्यांची नावं मला समजली असून मी त्यांना पक्षातून हद्दपार करणार' असल्याचं राज ठाकरे म्हणाले होते.

'गद्दारपणा करणाऱ्यांना पक्षात जागा नाही त्यांची हकालपट्टी मी करणार आहे. 2 दिवसात त्यांना पक्षातून हकालणार आहे' अशा थेट इशारा राज ठाकरे यांनी दिला होता. खरंतर गेल्या काही दिवसांपासून राज ठाकरे आणि मनसेविरोधात चुकीच्या बातम्या माध्यमांमध्ये पसरवल्या जात आहेत. राज ठाकरे कुठे जाणार आणि कुठे सभा घेणार याबद्दल त्यांनाही माहिती नसताना नको त्या चर्चा माध्यमांमध्ये सुरू आहेत. या चुकीच्या बातम्यांमुळे राज ठाकरे चिडले होते.

त्यामुळे पक्षातच काही गद्दार लोक आहेत. गद्दारांनी माझ्या सभेतूनदेखील बाहेर जावं असं कार्यकर्त्यांशी बोलताना राज ठाकरे म्हणाले. दरम्यान, पुढच्या दोन दिवसांमध्ये मी या गद्दार लोकांची नावं समोर आणून त्यांना पक्षातून काढून टाकेन असं राज ठाकरे म्हणाले होते.

First published: February 21, 2020, 8:44 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading