मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

राज ठाकरेंच्या मनसैनिकांनी अडवली शिवसेनेच्या दिग्गज नेत्याची गाडी, राजकीय संघर्ष पेटण्याची शक्यता

राज ठाकरेंच्या मनसैनिकांनी अडवली शिवसेनेच्या दिग्गज नेत्याची गाडी, राजकीय संघर्ष पेटण्याची शक्यता

मनसैनिकांनी यावेळी चंद्रकांत खैरे यांची गाडी अडवून त्यांच्या अंगावर निषेधाची पत्रक उधळली.

मनसैनिकांनी यावेळी चंद्रकांत खैरे यांची गाडी अडवून त्यांच्या अंगावर निषेधाची पत्रक उधळली.

मनसैनिकांनी यावेळी चंद्रकांत खैरे यांची गाडी अडवून त्यांच्या अंगावर निषेधाची पत्रक उधळली.

औरंगाबाद, 4 फेब्रुवारी : औरंगाबादचे नाव संभाजीनगर करण्यात यावं, अशी मागणी करत आज मनसेने शिवसेनेचे नेते आणि माजी खासदार चंद्रकांत खैरे यांची गाडी क्रांती चौकमध्ये अडवली. तसंच यावेळी शिवसेनेच्या निषेधार्थ घोषणाबाजीही करण्यात आली.

'शिवसेनेने सरकार चालवण्यापुढं लाचारी पत्करली आहे आणि याच लाचारीमुळे शिवसेना औरंगाबादचे नाव संभाजीनगर करू शकत नाही,' असा आरोप मनसेने केला आहे. आक्रमक झालेल्या मनसैनिकांनी यावेळी चंद्रकांत खैरे यांची गाडी अडवून त्यांच्या अंगावर निषेधाची पत्रक उधळली.

औरंगाबादचे नाव शिवसेना संभाजीनगर करत नाही, आज आम्ही शिवसेनेच्या वरिष्ठ नेत्यांची गाडी अडवली. प्रसंगी उद्या मुख्यमंत्र्यांची सुद्धा गाडी अडवणार असा इशारा मनसेने दिला. महत्त्वाचे म्हणजे पाच तारखेला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे औरंगाबाद दौऱ्यावर आहेत. यावेळी मनसे खरंच मुख्यमंत्र्यांची गाडी अडवणार का, असा प्रश्न आता उपस्थित झाला आहे.

हेही वाचा - BREAKING : नाना पटोले विधानसभा अध्यक्षपदाचा आजच राजीनामा देण्याची शक्यता

मनसेचे आंदोलन म्हणजे नौटंकी असल्याची टीका चंद्रकांत खैरे यांनी केली. शिवसेना संभाजीनगरसाठी बांधील असल्याचे खैरे म्हणाले. यावर पुन्हा मनसेनंही पलटवार केला. 'शिवसेना काहीही करणार नाही. या शहराचं नाव मनसेच बदलणार,' असं मनसेचे नेते सुहास दाशरथे यांनी सांगितलं.

दरम्यान, औरंगाबाद महापालिकाच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पुन्हा एकदा शहराच्या नामांतराचा वाद पेटताना दिसत आहे. यातच मनसेनं आक्रमक भूमिका घेत आता थेट शहरातील शिवसेनेच्या दिग्गज नेत्याची गाडी अडवल्याने वातावरण तापलं आहे. आगामी काळातही याच मुद्द्यावरून शिवसेना-मनसे संघर्ष होण्याची शक्यता आहे. याबाबत भविष्यात नेमक्या काय घडामोडी घडतात, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

First published:

Tags: Aurangabad, Aurangabad News, MNS, Shivsena