मुंबई, 29 मे : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली आहे. शरद पवार यांचे निवासस्थान असलेल्या सिल्व्हर ओक इथं मागील 48 तासांत ही बैठक झाली आहे. या भेटीत अनेक राजकीय मुद्द्यांवर चर्चा झाली असल्याची माहिती आहे.
लोकसभा निवडणूक निकालानंतर मनसेला आघाडीत घेण्याच्या हालचाली सुरू आहेत. या पार्श्वभूमीवर झालेली ही बैठक सुमारे पाऊण तास चालली असल्याची माहिती आहे. यावेळी दोन्ही नेत्यांमध्ये विधानसभा निवडणुकीत कोणत्या रणनीतीसह उतरायचे, याबाबत चर्चा झाली असण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
मनसेच्या नुकत्याच झालेल्या अनौपचारिक बैठकीत राज ठाकरे यांनी लोकसभा निकालांबाबत नेत्यांची मते जाणून घेतली आहेत. त्यामुळे आगामी काळात राज ठाकरे नेमकी काय भूमिका घेतात, याची उत्सुकता निर्माण झाली आहे.
दरम्यान, लोकसभा निवडणुकीत राज्यात काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीचा मोठा पराभव झाला. या पराभवानंतर राज ठाकरेंवरही प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे. कारण राज यांनी मोदी सरकारविरोधात राज्यात अनेक ठिकाणी सभा घेतल्या होत्या. राज ठाकरेंनी सभा घेतलेल्या जवळपास सर्व ठिकाणी युतीचे उमेदवार विजयी झाले आहेत.
राज ठाकरेंनी कुठे घेतल्या सभा आणि त्या मतदारसंघात कोण आहे पुढे?
हातकणंगले - स्वाभिमानी Vs शिवसेना, शिवसेनेच्या धैर्यशील मानेंचा विजय
पुणे - काँग्रेस Vs भाजप, भाजपचे गिरीश बापट विजयी
सोलापूर - काँग्रेस Vs भाजप, भाजपचे जयसिद्धेश्वर स्वामी विजयी
नाशिक - राष्ट्रवादी Vs शिवसेना, शिवसेनेचे हेमंत गोडसे आघाडीवर
मुंबई- युतीचे सर्व उमेदवार विजयी
नांदेड - भाजप Vs काँग्रेस, भाजपचे प्रताप पाटील चिखलीकर विजयी
पनवेल (मावळ)- राष्ट्रवादी Vs शिवसेना, शिवसेनेच्या श्रीरंग बारणेंचा विजय
पोलिसाच्या हातातली काठी झाली बासरी, सोशल मीडियावर VIDEO व्हायरल