मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /इंच इंच विकू हेच राज्यकर्त्यांचं धोरण - राज ठाकरे

इंच इंच विकू हेच राज्यकर्त्यांचं धोरण - राज ठाकरे

मुंबईतलं मराठी माणसांचं अस्तित्वच धोक्यात आलं आहे. इंच इंच विकू हेत राज्य कर्त्यांचं धोरण असल्याची टीका राज ठाकरे यांनी केली.

मुंबईतलं मराठी माणसांचं अस्तित्वच धोक्यात आलं आहे. इंच इंच विकू हेत राज्य कर्त्यांचं धोरण असल्याची टीका राज ठाकरे यांनी केली.

मुंबईतलं मराठी माणसांचं अस्तित्वच धोक्यात आलं आहे. इंच इंच विकू हेत राज्य कर्त्यांचं धोरण असल्याची टीका राज ठाकरे यांनी केली.

    मुंबई,ता,1 जुलै : मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पुन्हा एकदा मराठी अस्तिमतेचा मुद्दा उपस्थित केलाय. मराठी माणसांचं अस्तित्व मुंबईतून पुसून टाकण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप राज ठाकरे यांनी केलाय. मुंबईतलं मराठी माणसांचं अस्तित्वच धोक्यात आलं आहे. इंच इंच विकू हेच राज्य कर्त्यांचं धोरण असल्याची टीकाही त्यांनी केली.

    मुंबईतल्या वांद्रा इथं असलेल्या शासकीय वसाहतीला त्यांनी भेट आणि लोकांच्या समस्या ऐकून घेतल्या. पुनर्विकासासाठी इथल्या नागरिकांना घरं सोडायला राज्य सरकार सांगत आहे. इथल्या नागरिकांचा त्याला विरोध आहे. त्याला पाठिंबा देण्यासाठी राज ठाकरे इथं आले होते.

    साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदासाठी आता निवडणूक नाही! साहित्यातलं राजकारण संपणार?

    आता 'टॉयलेट-2' घेऊन येतोय अक्षय कुमार, शेअर केला हा VIDEO

    या वसाहतीतल्या मराठी माणसांना हुसकावून लावत तिथे परप्रांतियांना वसवण्याचा डाव असल्याचा आरोपही राज ठाकरे यांनी केला. इंच इंच विकू हे राज्यकर्त्यांचे धोरण आहे. परप्रांतियांच्या झोपडपट्ट्या वसवायच्या आणि नंतर त्यांना हक्कांची घरं द्यायची आणि इथल्या मराठी माणसांना बेघर करायचं हा राज्यकर्त्यांचा डाव आहे.

    कुठलही सरकार आलं तरी या धोरणात बदल होतं नाही. मुंबईतल्या मराठी माणसांचं अस्तित्वच धोक्यात आलं आहे. मुंबईला महाराष्ट्रापासून तोडण्याचा डाव असून त्यासाठीच बुलेट ट्रेनचा हट्ट केला जात आहे.

    राईनपाड्यात काय घडलं? अफवांचा बाजार, बेभान झालेला जमाव आणि 

    प्रवाशांनी गच्च भरलेली बस खोल दरीत कोसळली, 47 जणांचा मृत्यू

    राज ठाकरेंच्या भाषणातले इतर महत्वाचे मुद्दे

    • वांद्रयातल्या शासकीय वसाहतीमधल्या घरांना धक्का लागू देणार नाही.

    • पुनर्वसन करताना सरकारनेच योजना राबवाव्यात

    • बिल्डरांच्या फायद्यासाठीच पुनर्विकासाच्या योजना

    • नरेंद्र मोदी आणि अमित शहांच्या मर्जीनेच मुख्यमंत्री पदावर

    • मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार हे वेगळ्या विदर्भ राज्याबद्दल बोलतातच कसे?

    • मराठीचं अस्तित्वच नष्ट करण्याचा प्रयत्न होतोय

    • एकदा माझ्या हातात सत्ता देवून बघा, एकाही मराठी माणसाला बेघर व्हावं लागणार नाही.

     

    First published:

    Tags: Devendra Fadanvis, Land, Marathi, MNS, Mumbai, Raj Thackeray, मराठी, मराठी अस्मिता, मुंबई, राज ठाकरे