मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

'शिवतिर्था'वर फडकला तिरंगा, राज ठाकरेंच्या नातवाचं राष्ट्रध्वजाकडे लक्ष, पाहा EXCLUSIVE PHOTO

'शिवतिर्था'वर फडकला तिरंगा, राज ठाकरेंच्या नातवाचं राष्ट्रध्वजाकडे लक्ष, पाहा EXCLUSIVE PHOTO

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आवाहनाला जाहीर पाठिंबा दिला आहे.

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आवाहनाला जाहीर पाठिंबा दिला आहे.

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आवाहनाला जाहीर पाठिंबा दिला आहे.

  • Published by:  Chetan Patil
मुंबई, 13 ऑगस्ट : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आवाहनाला जाहीर पाठिंबा दिला आहे. पंतप्रधान मोदींनी देशभरातील नागरिकांना स्वातंत्र दिनाचं औचित्य साधत हर घर तिरंगा मोहिमेच्या माध्यमातून प्रत्येकाच्या घरी तिरंगा लावण्याचं आवाहन केलं आहे. देशाला स्वातंत्र मिळून 75 वर्ष पूर्ण होत आहेत. त्याच पार्श्वभूमावर स्वातंत्र्यदिनाचा अमृत महोत्सव साजरा केला जातोय. या अमृत महोत्सवाचा भाग म्हणूनच हर घर तिरंगा मोहिम राबवली जात आहे. या मोहिमेत राज ठाकरेदेखील सहभागी झाले आहेत. केंद्र सरकारच्या या मोहिमेला राज ठाकरे यांनी पाठिंबा देत शिवतिर्थावर तिरंगा फडकवला आहे. विशेष म्हणजे राज ठाकरे यांनी त्यांच्या घराच्या गॅलरीत लावलेला तिरंगा आणि त्यांच्या नातवाचा एक अनोखा फोटो कॅमेऱ्यात टिपला आहे. (मुख्यमंत्री झाल्यानंतर एकनाथ शिंदेंचा महाराष्ट्रातील सर्व आमदारांसाठी पहिला मोठा निर्णय) मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या घरावरही आज तिरंगा लावण्यात आला. त्या तिरंग्याकडे त्यांचा नातू किआन पहातानाचा फोटो राज ठाकरे यांनी मोबाईलच्या कॅमेऱ्यात टिपलाय. या फोटोत किआन हा बाल्कनीत पाळण्यात झोपलेला आहे. या बाल्कनीत राष्ट्रध्वज लावण्यात आला आहे. हा ध्वज वाऱ्यामुळे फडकतोय. त्याच्या आवाजातून किआनचं ध्वाजाकडे लक्ष गेल्याची शक्यता आहे. किआनचं राष्ट्रध्वजाकडे पाहणं हे भावनिक दृश्य आहे. हेच दृश्य राज ठाकरेंनी कॅमेऱ्यात कैद केलं आहे.
First published:

Tags: MNS, Raj Thackeray

पुढील बातम्या