गुंतवणुकीशिवाय राज ठाकरेंना 20 कोटींचा फायदा कसा? 'ईडी'समोर प्रश्न

गुंतवणुकीशिवाय राज ठाकरेंना 20 कोटींचा फायदा कसा? 'ईडी'समोर प्रश्न

22 ऑगस्टला राज ठाकरे यांची ईडीने कोहीनूर मिलप्रकरणी साडेआठ तास चौकशी केली होती.

  • Share this:

मुंबई, 28 ऑगस्ट : गेल्या आठवड्यात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची सक्तवसुली संचलनालयानं चौकशी केली. साडेआठ तासांहून अधिक काळ ही चौकशी झाली. कथित गैरव्यवहार प्रकरणाची तपासणी करताना कोणत्याही गुंतवणुकीशिवाय राज ठाकरे यांना 20 कोटींचा फायदा कसा झाला असा प्रश्न ईडीला पडला आहे. राज ठाकरे यांनी मातोश्री रियल्टर्समध्ये कोणतीही गुंतवणूक केलेली नाही. तरीही त्यांना 2008 मध्ये 20 कोटींचा फायदा झाला.

राज ठाकरे यांनी मातोश्री रियल्टर्स कंपनी स्थापन केल्यानंतर सहकारी बँकेकडून तीन कोटींचे कर्ज घेतलं होतं. याशिवाय कंपनीला अतिरिक्त एक कोटी रुपयांची आर्थिक मदतही मिळाली होती. ही मदतुद्धा कशी मिळाली असा प्रश्न सक्तवसुली संचलनालयाला पडला असल्याचं सूत्रांनी म्हटलं आहे. मातोश्री रियल्टर्समध्ये राज ठाकरे यांचे 25 टक्के शेअर्स होते. या प्रकरणी ईडीकडून चौकशी सुरु आहे. कागदपत्रांची पडताळणी सुरु असून पुन्हा आवश्यकता भासल्यास राज ठाकरे यांना चौकशीला बोलावण्यात येईल असंही ईडीने म्हटलं आहे.

कोहिनूर सीटीएनएल कंपनी कोहिनूर स्क्वेअरचं बांधकाम करत आहे. यातील आयएल अँड एफएसने त्यांची भागिदारी विकल्यानं कंपनीला 135 कोटींचं नुकसान झालं. त्याचवेळी राज ठाकरेंनी मातोश्री रियल्टर्समधील भागिदारी 80 कोटी रुपयांमध्ये विकली. जमीनींचे दर वाढल्यानं आम्हाला फायदा झाला असं राज ठाकरेंनी म्हटल्याचं समजते. यामधून राज ठाकरेंना 20 कोटी रुपयांचा फायदा झाला. उरलेली रक्कम त्यांनी मातोश्री रियल्टर्समधील भागिदारांना दिल्याचं वृत्त लोकमतने दिलं आहे.

राज ठाकरे यांच्या कंपनीनं गुंतवलेल्या पैशांमधील 3 कोटी रुपये सहकारी बँकेकडून तर 1 कोटी दोन बँक खात्यातून देण्यात आले होते. मात्र, ईडीच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार मातोश्री रियल्टर्समध्ये वेगवेगळ्या बँक खात्यांमधून 36 कोटी रुपयांची गुंतवणूक करण्यात आली होती. हे व्यवहार संशयास्पद वाटल्यानं तपास सुरु कऱण्यात आला.

VIDEO: 'NCPच्या झेंड्याचा दांडाच आमच्या हातात' BJP मेगाभरतीवर दानवेंचा नवा गौप्यस्फोट

First Published: Aug 28, 2019 12:55 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading