मुंबई, 24 मार्च : गुढी पाडवा मेळाव्याच्या भाषणामध्ये राज ठाकरे यांनी माहीमच्या समुद्रातली मजार आणि सांगलीची मशीद अनधिकृत असल्याचा दावा केला. तसंच या दोन्ही ठिकाणी कारवाईची मागणी केली. एवढच नाही तर माहीममधली मजार हटवली नाही, तर त्याच्या बाजूलाच गणपतीचं मंदिर उभारू, असा इशाराही राज ठाकरे यांनी दिला होता. राज ठाकरे यांच्या या इशाऱ्यानंतर 12 तासांमध्ये प्रशासनाने कारवाई करत दोन्ही ठिकाणांवरचं अनधिकृत बांधकाम हटवलं.
या कारवाईनंतर राज ठाकरे यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे. माहीमच्या त्या मजारीचा फोटो राज ठाकरे यांनी सोशल मीडियावर शेअर केला आहे. सोबतच त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री तसंच गृहमंत्री देवेंद्र फडणवीस आणि प्रशासनाचे आभार मानले आहेत. याचसोबत त्यांनी जनतेलाही जागृक राहण्याचा सल्ला दिला आहे.
काय म्हणाले राज ठाकरे?
सस्नेह जय महाराष्ट्र!
धर्मांध मुस्लिमांनी मुंबईत माहीमच्या समुद्रात बांधलेल्या अनधिकृत मजारीची, सांगलीत कुपवाडच्या हिंदू वस्तीत परवानगी नसताना अतिक्रमण करून बांधलेल्या अनधिकृत मशिदीची दृश्य मी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या गुढीपाडवा मेळाव्यात व्हिडिओद्वारे दाखवली आणि अनेकांना धक्का बसला. तात्काळ दुसऱ्याच दिवशी महाराष्ट्र सरकारने त्या अनधिकृत बांधकामांवर तडक कारवाई केली त्याबद्दल मी मुख्यमंत्री श्री. एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री/गृहमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस, मुंबईचे पोलीस आयुक्त श्री. विवेक फणसाळकर, मुंबई मनपा आयुक्त श्री. इक्बाल चेहेल ,सांगली मनपा आयुक्त, जिल्हाधिकारी तसंच इतर प्रशासकीय अधिकाऱ्यांचे, कर्मचाऱ्यांचं अभिनंदन करतो, आभार मानतो.
आपल्या डोळ्यादेखत अशी अतिक्रमणं राज्यभर सुरु आहेत, लक्षात घ्या हे फक्त अतिक्रमण नव्हे तर धार्मिक स्थळांच्या आडून केलेलं हे आक्रमणच आहे त्यावर वेळीच उपाययोजना नाही झाली तर हेच आपल्याला भविष्यात त्रासदायक ठरू शकतं. त्यामुळे शासन-प्रशासनासह प्रत्येक हिंदू बांधवानेही दक्ष राहायलाच हवं!
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: MNS, Raj Thackeray