मनसेच्या पदाधिकाऱ्यांची धरपकड, अविनाश जाधवांसह या 4 मोठ्या नेत्यांना पोलिसांनी घेतलं ताब्यात

कोणतीही गडबड होऊ नये म्हणून मनसेच्या अनेक पदाधिकाऱ्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे.

News18 Lokmat | Updated On: Aug 22, 2019 10:37 AM IST

मनसेच्या पदाधिकाऱ्यांची धरपकड, अविनाश जाधवांसह या 4 मोठ्या नेत्यांना पोलिसांनी घेतलं ताब्यात

मुंबई, 22 ऑगस्ट : कोहिनूर मिलप्रकरणी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची आज (गुरुवारी) ईडीसमोर चौकशी होणार आहे. या पार्श्वभूमीवर ईडी कार्यालय, कृष्णकुंज आणि दक्षिण मुंबई परिसरात कडेकोट बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. तसंच कोणतीही गडबड होऊ नये म्हणून मनसेच्या अनेक पदाधिकाऱ्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे.

कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी पोलिसांनी मनसैनिकांची धरपकड करण्यास सुरुवात केली आहे. मनसेचे ठाणे जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांना पोलिसांनी घरातून ताब्यात घेतलं आहे.

मनसेचे आणखी कोणते पोलिसांच्या ताब्यात?

मनसे ठाणे शहर अध्यक्ष रवींद्र मोरे यांनाही पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. कोणतीही गडबड होऊ नये म्हणून मनसेच्या पदाधिकाऱ्यांना पोलीस स्थानकात बसवून ठेवण्यात आलं आहे. ही कोणतीही कारवाई नसून खरबरदारी म्हणून उचललेलं पाऊल आहे, असं स्पष्टीकरण पोलिसांकडून देण्यात आलं आहे.

मनसेचे पदाधिकारी संतोष धुरी यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. ताब्यात घेतल्यानंतर संतोष धुरी यांना कीर्ती कॉलेज परिसरात पोलिसांकडून नेण्यात आलं आहे.

Loading...

दरम्यान, आज सकाळीच 'EDiot Hitler' (इडियट हिटलर) असा उल्लेख असलेला टी शर्ट परिधान केल्याने शिवाजी पार्क पोलिसांनी मनसेचे सरचिटणीस संदीप देशपांडे यांना ताब्यात घेतलं. संदीप देशपांडे सकाळच्या सुमारास ते जॉगिंगला आले असतानाच पोलिसांनी कारवाई करत त्यांना ताब्यात घेतलं. कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये, यासाठी त्यांना ताब्यात घेतल्याचे पोलिसांनी सांगितलं आहे. 'EDiot Hitler' (इडियट हिटलर)चे टी शर्ट परिधान केलेले अनेक मनसैनिक रस्त्यावर दिसत आहेत.

कुठे काय उपाययोजना?

मुंबईच्या फोर्ट परिसरात असलेल्या ईडीच्या कार्यालयाबाहेर छावणीचं स्वरुप आले आहे. कडेकोट पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. मोबाइल जामरही लावण्यात आला आहे.

दक्षिण आणि मध्य मुंबईतील काही भागात राज ठाकरे यांच्या चौकशीमुळे कलम 144 अर्थात जमावबंदीचे आदेश जारी करण्यात आले आहेत. जवळपास एक हजारपेक्षा जास्त पोलीस ईडी कार्यालयाच्या संपूर्ण परिसरात तैनात करण्यात आले आहेत. या परिसरात त्रिस्तरीय सुरक्षा व्यवस्था लावण्यात आली आहे. ईडी कार्यालयाच्या भागात 500 मीटर्स, 200 मीटर्स आणि 50 मीटर्स अशा तीन स्तरात सुरक्षा व्यवस्था लावण्यात आली आहे. या भागात ईडी व्यतिरिक्त इतरही सरकारी आणि खासगी कार्यालयं असल्यामुळे 500 मीटर अंतरावरावर बॅरिकेड्स लावून फक्त अशाच वाहनांना प्रवेश दिला जात आहे.

उद्धव ठाकरेंनी दिली राजना क्लीन चिट? पाहा हा SPECIAL REPORT

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Aug 22, 2019 10:37 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...