कर्नाटकमधील मोदी विरोधकांच्या एकजुटीचं श्रेय हे माझंच, राज ठाकरेंचा दावा

कर्नाटकमधील मोदी विरोधकांच्या एकजुटीचं श्रेय हे माझंच, राज ठाकरेंचा दावा

कुमारस्वामी यांच्या शपथविधीला सर्व पक्षांनी एकत्र यावा यासाठीचा गिअर मी टाकला होता असं मनसे अध्यक्ष राज ठाकरे म्हणाले आहेत.

  • Share this:

25 मे : कुमारस्वामी यांच्या शपथविधीला सर्व पक्षांनी एकत्र यावा यासाठीचा गिअर मी टाकला होता असं मनसे अध्यक्ष राज ठाकरे म्हणाले आहेत. रत्नागिरीत पत्रकार परिषदेत त्यांनी हे वक्तव्य केलं आहे.

दरम्यान यामुळेच आज प्रादेशिक पक्षांच्या आघाडीचे संकेत मिळत आहेत असंही ते म्हणाले. त्यामुळे कर्नाटकमधील मोदी विरोधकांच्या एकजुटीचं श्रेय घेण्यामध्ये चढाओढ सुरु झाली असं म्हणायला हरकत नाही.

कुमारस्वामी यांच्या शपथविधीला भाजपविरोधात सर्व पक्षांच्या एकत्र येण्याचा गिअर मीच टाकला होता. आणि त्यामुळेच आज प्रादेशीक पक्षांच्या आघाडीचे संकेत मिळतायत असं मनसे अध्यक्ष राज ठाकरे म्हणालेत. गुढीपाडव्याला आपण याबाबत आवाहन केल होत अशी आठवणही राज ठाकरे यानी करुन दिली. ते रत्नागिरीत बोलत होते.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: May 25, 2018 04:03 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading