राज ठाकरेंनी दिला तरुणांना 'यशाचा मंत्र'

राज ठाकरेंनी दिला तरुणांना 'यशाचा मंत्र'

'स्टीव्ह जॉब्स सारखा उत्तमतेचा आग्रह धरा. तुमच्यात एखादा गायक, कलाकार दडलेला असेल तेव्हा त्याचा आधी शोध घ्या, मग नोकरीच्या मागे लागू नका.'

  • Share this:

पुणे 16 जून :  मळलेल्या पायवाटेवरून न जाता तरुणांनी नवी वाट निर्माण करावी, त्यात आव्हाने आहेत मात्र ती आव्हाने पेलण्यातच खरी कसोटी असते. तरुणांनी फक्त नोकरीच्या मागे न लागता रोजगार देणारे झालं पाहिजे असा सल्ला मनसेचे अध्यक्ष  राज ठाकरे यांनी त्यांनी तरुणांना दिला. निमित्त होतं पुण्यातले मनसेचे नगरसेवक वसंत मोरे यांनी आयोजित केलेल्या नोकरी महोत्सवाचं. राज ठाकरे यांच्या हस्ते या महोत्सवाचं उद्घाटन झालं. प्रचारात विरोधकांवर तुटून पडणारे, आक्रमक भाषणांसाठी प्रसिद्ध असलेलेच राज ठाकरे सगळ्यांना माहित आहेत. पण या कार्यक्रमात राज ठाकरेंनी तरुणांना दिशा कशी शोधावी याचाही मंत्र सांगितला.

राज ठाकरे म्हणाले, नोकरीच्या पाठीमागे न लागता तरुणांनी स्वतःला काय आवडते ते शोधलं पाहिजे, हुनर शोधाला पाहिजे. आपल्यामध्ये दडलेलं टॅलेंट शोधलं पाहिजे. तुम्ही जर स्वत:ला ओळखण्यात यशस्वी ठरलात तर जगात यशस्वी होण्यापासून तुम्हाला कोणीच रोखू शकत नाही असंही त्यांनी उदाहरणं देऊन सांगितलं.

हे सांगण्यासाठी त्यांनी मुंबईतील वडापाव आणि भेळपुरी विकणाऱ्यांची उदाहरणं दिली. ते म्हणाले, त्याचा व्यवसाय इतका होतो की इन्कम टॅक्स विभागाचा छापा त्यांच्यावर पडतो. त्यांची मुलं परदेशात शिकयला जातात. पण हे करण्यासाठी कठोर मेहेनत करावी लागेल. कठिण परिश्रमाशिवाय कुठलीही गोष्ट साध्य होत नाही असंही त्यांनी सांगितलं.

स्टीव्ह जॉब्स सारखा उत्तमतेचा आग्रह धरा. तुमच्यात एखादा गायक, कलाकार दडलेला असेल तेव्हा त्याचा आधी शोध घ्या, मग नोकरीच्या मागे लागू नका असं आवाहनही त्यांनी केलं. कुठल्याही कामाची लाज बाळगू नका असाही सल्ला त्यांनी दिला.

हडपसर मध्ये झालेल्या या कार्यक्रमात आपलं घर या अनाथ आश्रमातील मुलांसमवेत राज यांच्या नुकत्याच झालेल्या वाढदिवसाच्या निमित्ताने केकही कापण्यात आला.

First published: June 16, 2019, 8:04 PM IST

ताज्या बातम्या