निकालापूर्वी राज ठाकरेंचा नरेंद्र मोदींवर हल्ला; ‘त्या पत्रकार परिषदे’वरून साधला निशाणा

निकालापूर्वी राज ठाकरेंचा नरेंद्र मोदींवर हल्ला; ‘त्या पत्रकार परिषदे’वरून साधला निशाणा

राज ठाकरे यांनी पुन्हा एकदा नरेंद्र मोदींवर हल्लाबोल केला आहे.

  • Share this:

मुंबई, अक्षय कुडकेलवार, 14 मे : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पुन्हा एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदींवर हल्लाबोल केला आहे. यापूर्वी राज ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींची पत्रकार परिषद म्हणजे 'मौन की बात' असल्याची टीका त्यांनी ट्विटरवरून केली होती. त्यानंतर त्यांनी पुन्हा एकदा नरेंद्र मोदींवर टीका केली.

'ज्या पत्रकार परिषदेत मोदी बोलले नाहीत त्या पत्रकार परिषदेबद्दल न बोललेलं बरं. पत्रकारांना सामोरं जायला आपला पंतप्रधान घाबरतो हे दुर्दैव आहे. अमित शहा यांनाच बोलायचे होते तर हे आले तरी कशाला? पाच वर्षानंतरही यांना पत्रकरांशी बोलावसं वाटत नाही ही त्यांची मानसिक हार आहे. यांच्यामध्ये लोकांचे बोलणं ऐकण्याची आणि उत्तर देण्यास हिंमत नाही. पंतप्रधान का घाबरतात याचे उत्तर त्यांनी द्यावे.' अशा शब्दात राज ठाकरे यांनी नरेंद्र मोदींवर निशाणा साधला.

'शेवटच्या 48 तासात मुस्लिम मतं काँग्रेसकडे वळली'

कुठे बालले राज

दादर शिवाजी पार्क येथे आंबा महोत्सवाच्या कार्यक्रमामध्ये राज ठाकरे यांनी हजेरी लावली होती. यावेळी बोलत असताना त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीकास्त्र डागलं.

मोदींना शह देण्यासाठी विरोधकांची तयारी; असा आहे काँग्रेसचा 'मास्टरप्लॅन'

अमित शहा यांना देखील केलं लक्ष्य

दरम्यान, पश्चिम बंगालमधील झालेल्या घटनेनंतर राज यांनी अमित शहा यांना देखील लक्ष्य केलं. आतापर्यंत नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांनी दादागिरी केली. आता त्यांनी भोगावी. त्याची सुरुवात पश्चिम बंगालमध्ये झाली आहे. अमित शहा यांना दादागिरी काय असते हे आता कळेल अशी टीका देखील यावेळी राज यांनी केली.

मोदी, शहा निशाण्यावर

राज ठाकरे यांनी लोकसभा निवडणुकीच्या प्रचारात थेट मोदी, शहा आणि भाजप सरकारवर टीका केली होती. मनसेने उमेदवार उभा केला नसताना देखील राज यांनी महाराष्ट्रात सभा घेतल्या होत्या. आता निवडणुकीच्या अखेरच्या टप्प्यात देखील त्यांनी पुन्हा मोदींवर टीका केली.

बुद्ध पौर्णिमेनिमित्त बुद्ध संस्कृती आणि परंपरेची ओळख करून देणारा SPECIAL REPORT

First published: May 18, 2019, 12:37 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading