BREAKING: राज ठाकरेंकडून मनसेच्या नव्या झेंड्याचं अनावरण

BREAKING: राज ठाकरेंकडून मनसेच्या नव्या झेंड्याचं अनावरण

राज ठाकरे हे हिंदुत्त्वाची भूमिका घेणार असल्याचा अंदाज लावण्यात येत आहे.

  • Share this:

मुंबई, 23 जानेवारी: राज ठाकरे यांच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचं आज पहिलं राज्यव्यापी महाअधिवेशन आहे. गोरेगावच्या नेस्को सेंटरमध्ये सकाळी 10 वाजता या अधिवेशनाला सुरुवात झाली आहे. या अधिवेशनामध्ये मनसेनं आपला नवा झेंड्याचं अनावरण केलं आहे. नव्या झेंड्य़ासोबतच मनसेचा हिंदुत्वाचा अजेंडा अधिक ठळक झाल्याचं दिसून येत आहे. मनसेच्या झेंड्याचे स्वरुप स्पष्ट झालं आहे. न्यूज 18 लोकमतने सर्वात पहिल्यांदा हा झेंडा दाखवला होता. या बातमीवर आता शिक्कामोर्तब झाला आहे. भगव्या रंगाचा झेंडा आणि त्यावर छत्रपती शिवाजी महाराजांची 'राजमुद्रा' असं याचं स्वरूप आहे. गोरेगावमध्ये मनसेकडून जोरदार शक्तिप्रदर्शन करण्यात येत आहे.

राज ठाकरे यांचे सुपुत्र अमित ठाकरे हे सक्रीय राजकारणात एण्ट्री करणार असल्याची चर्चा आहे. अधिवेशनाआधी राज यांच्या पत्नी शर्मिला ठाकरे यांनी याबाबत बोलण्यास मात्र नकार दिला आहे. 'अमित ठाकरे यांचं राजकीय लॉन्चिंग होणार का?' असा प्रश्न विचारल्यावर शर्मिला ठाकरे म्हणाल्या की, 'माहीत नाही. पण झालंच तर आनंद होईल. अधिवेशनाबाबत मोठा सस्पेन्स आहे.'

मनसेच्या राज्यव्यापी अधिवेशनाला मोठ्या प्रमाणात मनसे कार्यकर्ते आणि पदाधिकारी हजर राहणार असल्याची माहिती आहे. गोरेगावच्या नेस्को सेंटरला अधिवेशनासाठी 20 ते 25 हजार कार्यकर्ते उपस्थित राहणार असल्याची माहिती मिळत आहे. यासाठी मोठा पोलीस बंदोबस्तही तैनात करण्यात आला आहे.

हेही वाचा-सुबोध भावेने IDEA मांडताच काँग्रेस मंत्र्याने आश्वासन देऊन टाकलं!

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jan 23, 2020 11:26 AM IST

ताज्या बातम्या