कोकणात पावसाचा जोर ओसरला

कोकणात पावसाचा जोर ओसरला

पण तरीही कोळ्यांनी पाण्यात उतरू नये अशी सुचना हवामान विभागाने दिला आहे. येत्या 24 तासात जोरदार पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.

  • Share this:

20 सप्टेंबर: कोकणात गेले दोन दिवस चालू असलेल्या पावसाने थोडीशी उसंत घेतली आहे. त्यामुळे मुंबई गोवा हायवेवरील वाहतूक पुन्हा सुरळीतपणे चालू झाला आहे.

दोन दिवसांपूर्वी हवामान खात्याने कोकणात मुसळधार पावसाचा इशारा दिला होता. त्यानुसार सिंधुदुर्ग ,रायगड, रत्नागिरीमध्ये मुसळधार पाऊस झालाय काही नद्यांना पूरही आला.पण आता पाऊस ओसरला आहे. नद्यांचं पाणी ओसरायला लागल्यामुळे रस्ते वाहतूक सुरळीत होऊ लागली आहे. पण तरीही कोळ्यांनी पाण्यात उतरू नये अशी सूचना हवामान विभागाने दिला आहे. येत्या 24 तासात जोरदार पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.

गेल्या 24 तासात रायगड जिल्ह्यात माथेरानला 362 मिमी, खालापूरला-153 मिमी, पेणला 220 मिमी, मुरुडला 60 मिमी ,पनवेलला 254 मिमी, उरणला 240 मिमी ,माणगावला 114मिमी, रोह्यात 62 मिमी, सुधागडला 101मिमी, तळाला 92मिमी, महाडला 88मिमी, पोलादपूरला 105 मिमी, म्हसळाला 182 मिमी आणि श्रीवर्धनला 120 मिमी तर अलिबागला 118 मिमी पाऊस झाला आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Sep 20, 2017 10:02 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading