अवकाळी पाऊस : शहरात दिलासा, पिकांना धोका; पुढचे 2 दिवस कशी बदलेल हवा?

अवकाळी पाऊस : शहरात दिलासा, पिकांना धोका; पुढचे 2 दिवस कशी बदलेल हवा?

उकाड्यानं हैराण झालेल्यांसाठी दिलासा असला तरी शेतकरी मात्र चिंतेत. अवकाळी पावसाचा सर्वसामान्यांवर काय होणार परिणाम?

  • Share this:

मुंबई, 13 एप्रिल: राज्यात एकीकडे तापमानाचा पारा वाढत असताना काही ठिकाणी अवकाळी पावसानं हजेरी लावली आहे. चातकासारखी वाट पाहणाऱ्या उकाड्यानं हैराण झालेल्या नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे. कोल्हापूर, साताऱ्यातील काही भागांमध्ये पावसाने जोरदार हजेरी लावली. ढगांच्या कडकडासह पावसाच्या सरी बरसल्यानं वातावरणात गारवा जाणवू लागला आहे. दुसरीकडे कोकण आणि गोव्यात ढगाळ वातावरण असल्याचा अंदाज आहे. रत्नागिरीतील काही भागांमध्ये जोरदार पावसानं हजेरीही लावली आहे. अवकाळी पावसामुळे आंबा आणि काजू उत्पादक धास्तावले आहेत. ढगाळ वातावरण, गारांसह जोरदार पडणाऱ्या पावसामुले आंबा उत्पादन धोक्यात येण्याची चिन्हं आहेत. वादळी वारा आणि गारांमुळे शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला पिकाचं मोठं नुकसान होण्याची शक्यता आहे. उकाड्यानं हैराण झालेल्यांसाठी दिलासा असला तरी शेतकरी मात्र चिंतेत आहे.

नागपुरातील काही ग्रामीण भागांमध्ये ढगाळ वातावरण होतं.

अवकाळी पावसामुळे काय होणार  परिणाम?

अवकाळी पावसामुळे बागायती फळांचं मोठं नुकसान होऊ शकतं. आंबा, काजू, चिकूसह इतर पिकांना फटका बसू शकतो.

वादळ-वारा, ढगांच्या कडकडासह जोरदार पाऊस झाल्यास वित्तहानी होण्याचा धोका.

अवकाळी पावसानं नागरिक, शेतकरी, छोटे व्यापारी यांच्यावर परिणाम होईल.

वातावरणात जास्त बदल होईल. वातावरणात जास्त उष्णता वाढेल परिणामी उकाडा वाढल्यानं जास्त त्रास होऊ शकतो.

अवकाळी पावसामुळे वातावरणात बदल होत असतात त्यामुळे व्हायरल इन्फेक्शन, आजार उद्भवू शकतात.

शेतकऱ्यांची कापलेला कडबा, गवत भिजण्याची शक्यता आहे. मच्छीमारांची सुकणारी मच्छीही अवकाळी पावसामुळे खराब होण्याची शक्यता असते.

VIDEO: नागपूरच्या शासकीय रुग्णालयात नातेवाईकांना मारहाण

First published: April 13, 2019, 10:08 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading