मुंबईसह राज्यात पावसाची दमदार एंट्री

मुंबईसह राज्यात पावसाची दमदार एंट्री

  • Share this:

10 जून : गेले काही दिवस घामाच्या धारांनी भिजणारे मुंबईकर आज पावसाच्या धारांनी चिंब भिजले. दिवस उजाडण्याआधीच मुंबईच्या आकाशाचा ताबा काळ्या ढगांनी घेतला आणि शहर तसंच उपनगरात पावसाने दमदार हजेरी लावली.   मुंबई शहर आणि उपनगरामध्ये रात्रभर जोरदार पाऊस झाला. तसंच ठाण्यातही रात्रीपासूनच पाऊस सुरू आहे.

कांदिवली, मालाड, दहिसर, मिरारोड या भागात रात्रभर मुसळधार पावसाने हजेरी लावली. तर अजूनतरी पावसाचा लोकलसेवा काहीही परिणाम दिसत नाहीये. पुढच्या काही तासात मान्सून महाराष्ट्रात  सक्रिय होणार असल्याची माहिती हवामान विभागाने दिली आहे.

राज्यभरात पावसाचा जोर वाढलाय. मान्सूनचं जोरदार आगमन झालं आहे. त्यामुळे उकाड्यानं त्रस्त झालेल्या नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे. पश्चिम महाराष्ट्र, कोकणात अनेक ठिकाणी रात्रीपासून पावसाला सुरुवात झाली आहे. तहानलेल्या मराठवाड्यालाही पावसामुळे दिलासा मिळाला आहे. अजून विदर्भात पावसानं हजेरी लावलेली नाही, पण राज्यभरात पावसाचं वेळेवर आगमन झाल्यानं बळीराजा सुखावलाय.

महाबळेश्वरमध्ये पावसाच्या हलक्या सरी :

महाराष्ट्राचे मिनी काश्मीर असलेल्या महाबळेश्वरमध्ये पावसाच्या  हलक्या सरी कोसळतायेत. त्यामुळे हिल स्टेशन असलेल्या महाबळेश्वराच्या वातावरणात आणखीनच गारवा निर्माण झाला आहे. पर्यटक रिमझिम रिमझिम पाऊस धारेचा आनंद लुटतायेत. महाबळेश्वरचं सौंदर्य या सरीत आणखी खुललं आहे. उन्हाळ्याच्या उकाड्याला कंटाळलेल्या पर्यटकांनी  महाबळेश्वर गाठलं. त्यात पावसानं सरी बरसवल्यानंतर आणखी दुसरं काय हवं असा आनंद सर्वत्र दिसतोय.

बुलडाण्यात पावसाची दमदार हजेरी

बुलडाणा जिल्ह्यात काल पावसाने पुन्हा एकदा जोरदार हजेरी लावली आहे. संध्याकाळपासूनच बुलडाणा, चिखली, मेहकर तालुक्यासह ग्रामीण भागात हा पाऊस जोरदार बरसला, पावसाची सतत धार रात्री उशिरा पर्यंत सुरू असल्याने अनेक ठिकाणी पाणीसुद्धा साचले आहे. मात्र, या पावसाने शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला असून पीक पेरणीचा मार्ग मोकळा झाला आहे. सोबतच वातावरणात कमालीचा बदल झाल्याने उकड्यापासून सुटला झाली आहे.

कर्जत, खालापूर आणि माथेरानमध्ये ठिकठिकाणी साचलं पाणी :

कर्जत खालापूर आणि माथेरानमध्ये काल दुपारपासून पावसानं दमदार हजेरी लावली असली तरी मध्यरात्री पावसानं विश्रांती घेतली आहे. मात्र पहिल्या पावसात कर्जत शहरात कचेरीरोडवर पाणी साचलं होतं. तर शहराच्या काही भागात रस्त्यांवर पाणी साचलं होतं. नेरळ इथंही रस्त्यावर पाणी साचलं होत. तर कडाव इथं गटारांची साफसफाई न केल्यानं गटारं ओसंडुन वाहत होती. एक्स्प्रेसवे वरील वाहतूक सुरळीत सुरू होती.

 नाशिक जिल्ह्यात पावसामुळे जनजीवन विस्कळीत, वीज पडून एका महिलेचा मृत्यू :

गेल्या तीन दिवसा पासून मनमाड, मालेगांव,चांदवड,येवला तालुक्यात सलग जोरदार पाऊस होत असल्याने जनजीवन विस्कळीत झाले. चांदवड तालुक्यात तर अतिवृष्टी झाल्याचे चित्र असून सर्व नदी नाले पहिल्या पावसातच दुथडी भरून वाहत आहे. वीज पडून एका महिलेचा मृत्यू झाला तर पुरात काही जनावरे वाहून गेली. निफाड जवळ असलेल्या नदीला पूर येऊन, त्याचे पाणी पुला वरून वाहत होते. त्यामुळे नाशिक औरंगाबाद मार्गावरील वाहतूक ठप्प झाली होती. मालेगांवमध्ये जोरदार पाऊस झाल्याने अनेक भागात पाणी साचले होते, तर मोसम नदीला पूर आला आहे. येवल्यात ही जबरदस्त पाऊस झाला आहे. मनमाडला देखील समाधान कारक पाऊस होत असल्याने बळीराजा सुखावला आहे.

 

First published: June 10, 2017, 11:59 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading