मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

 राज्यात  अनेक ठिकाणी  पावसाची दमदार हजेरी;काही ठिकाणी पूर परिस्थिती

 राज्यात  अनेक ठिकाणी  पावसाची दमदार हजेरी;काही ठिकाणी पूर परिस्थिती

मुंबईप्रमाणेच पुण्यातही पावसाची संततधार सुरू आहे. पुण्यात होत असलेल्या पावसामुळे खडकवासला धरणातून 23000 क्युसेकने पाण्याचा विसर्ग सुरू झाला आहे.तसंच पुणे शहरातील भिडे पूल पाण्याखाली गेला आहे.

20 सप्टेंबर: मुंबईमध्ये मुसळधार पाऊस चालत असतानाच राज्यभरही पावसाने दमदार हजेरी लावली आहे. राज्यातील अनेक धरणांमधून पाणी सोडले गेले असून अनेक ठिकाणी पूर परिस्थिती निर्माण झाली आहे. मुंबईप्रमाणेच पुण्यातही पावसाची संततधार सुरू आहे. पुण्यात होत असलेल्या पावसामुळे खडकवासला धरणातून 23000 क्युसेकने पाण्याचा विसर्ग सुरू झाला आहे.तसंच पुणे शहरातील भिडे पूल पाण्याखाली गेला आहे. तर कोल्हापूरच्या राधानगरी धरणाचे पाच स्वयंचलित दरवाजे  बंद झाले आहेत. 5 नंबर आणि 7 नंबरचा दरवाजा खुला करण्यात आला आहे.  5 व्या दरवाज्यातून 2856 तर 7 व्या दरवाज्यातून 2200 क्युसेक पाण्याचा  विसर्ग सुरू आहे. जिल्ह्यातील 33 बंधारे पाण्याखाली गेले आहेत.   पंचगंगा नदीची  पाणी पातळी 28 फूट 11 इंचावर पोचली आहे तर नाशिकमध्ये धरणाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये पावसाने दमदार हजेरी लावली आहे. जिल्ह्यातील पाच धरणांच्या पाणलोट क्षेत्रात पावसाची संततधार सुरू आहे.गंगापूर धरणातून प्रती सेकंद 4424 क्यूसेक, दारणा धरणातून प्रती सेकंद 4316 क्यूसेक ,कडवा धरणातून प्रती सेकंद 2968 क्यूसेक, पालखेड धरणातून प्रती सेकंद 3317 क्यूसेक , पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे. साताऱ्यातले कोयना धरण भरले असून 15000 क्युसेकने पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे. तर पंढरपूरमध्ये भिमा नदीच्या तीराजवळ राहणाऱ्या लोकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. उजनी धरणातून 40,000 क्युसेकने भिमा नदीत पाणी सोडण्यात आलं आहे.तर पालघर जिल्ह्यातही पावसाची संततधार चालू असल्यामुळे अनेक घरांची छप्परं उडून गेली आहेत.
First published:

Tags: Rains, State, धरणं, पूर

पुढील बातम्या