पावसाचा ठाण्याला जोरदार फटका

पावसाचा ठाण्याला जोरदार फटका

पावसाची संततधार लागल्यमुळे ठाण्यातलं जनजीवन विस्कळीत झालंय.

  • Share this:

25जून : ठाण्यात काल रात्रीपासूनच पावसाची संततधार लागल्यामुळे ठाण्यातलं जनजीवन विस्कळीत झालंय.

काल रात्रीपासून चाललेल्या पावसामुळे ठाणे ,कळवा ,  दिवा या स्टेशनांवरही पाणी साचलय. वाशी-ठाणे लोकल सेवा ठप्प झालीयं. रात्रभर झालेल्या तुफान पावसामुळे ठाण्याची दाणादाण उडालीय.

घरांमध्ये ,दुकानांमध्ये पाणी शिरलंय. ठाण्यात ठिकठिकाणी अडीच ते तीन फुट पाणी साचल्यानं ठाण्यातले अनेक रस्ते बंद झाले आहेत. एसटी  सेवाही ठप्प झालीय. प्रवासीही काही भागात अडकले आहेत.

काल रात्रीपासून साधारण 100 मिलीमीटर पाऊस झाल्याचा अंदाज आहे . सकाळपासून मात्र ठाण्यात  पावसाचा जोर थोडा ओसरलाय.

First published: June 25, 2017, 12:15 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading