धुळे, 05 जुलै : राईनपाडा हत्याकांडातील मुख्य आरोपीला नवापूरमधून अटक करण्यात आली आहे. महारू पवार असं त्याचं नाव आहे. राईनपाडामध्ये १ जुलैला पाच जणांची मुलं पळवण्याच्या अफवेतून ठेचून हत्या करण्यात आली होती. याच प्रकरणातल्या मुख्य आरोपीला नंदुरबार जिल्ह्यातील नवापूर तालुक्यातून पोलीस निरीक्षक दिवाणसिंग वसावे यांच्या पथकानं अटक केली आहे. यामुळे अन्य आरोपींचा तपास घेणं पोलिसांना शक्य होईल.
धुळे जिल्ह्यातल्या साक्री तालुक्यात काळजाचा थरकाप उडवणारी घटना घडली होती. मुलं चोरणाऱ्या टोळीच्या संशयावरून राईनपाडा इथं जमावाने 5 जणांची निघृण हत्या केली होती. दुपारी 12 च्या सुमारास ही घटना घडली.
हेही वाचा
JioGigaFiber,जिओ टीव्ही लाँच,रिलायन्सच्या सभेतील 6 महत्त्वाचे मुद्दे
कर्करोगग्रस्त सोनालीला भेटायला पोहोचला 'हा' सुपरस्टार
Sunanda Pushkar case : शशी थरूर यांना अटकपूर्व जामीन मंजूर
राईनपाडा आणि परिसर हा आदिवासी पाड्यांचा भाग आहे. गेल्या काही दिवसांपासून या भागात मुलं चोरणारी टोळी फिरत असल्याची अफवा होती. आज राईनपाडा इथं आठवडी बाजार होता. त्यामुळं लोकांची गर्दी होती. आठवडी बाजारामुळं फवेची चर्चा जास्त झाली.
संशयावरून काही लोकांनी पाच जणांना ताब्यात घेतलं आणि त्यांना ग्रामपंचायतीच्या खोलीत कोंडून ठेवलं. संतप्त नागरिकांनी या ग्रामपंचायतीला वेढा घातला आणि कार्यालयाची दारं खिडक्या तोडून ते आत घुसले आणि पाचही जणांना प्रचंड मारहाण केली. लाकडाच्या दांडक्याने मारत त्यांना ठार केलं.
मृतांची नावं
1) भारत शंकर भोसले
2) दादाराव शंकर भोसले
3) भारत शंकर मालवे
4) अप्पा श्रीमंत भोसले
5) राजू भोसले
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.