मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

Monsoon Update: यंदा देशात समाधानकारक पाऊस; दुष्काळाची शक्यता कमीच, हवामान खात्याचा सुधारित अंदाज

Monsoon Update: यंदा देशात समाधानकारक पाऊस; दुष्काळाची शक्यता कमीच, हवामान खात्याचा सुधारित अंदाज

Weather Update: गेल्या पंधरवड्यात देशाला दोन चक्रीवादळाने (Cyclone) जोरदार तडाखा दिला आहे. त्यामुळे मागील काही दिवसांपासून राज्यात हवामानाची स्थिती बेभरवशी झाली आहे. त्यामुळे यंदा राज्यात पावसाची (Monsoon) काय स्थिती असेल याबाबत शेतकऱ्यांना चिंता लागली आहे.

पुढे वाचा ...
  • Published by:  News18 Desk
पुणे, 02 जून: गेल्या पंधरवड्यात देशाला दोन चक्रीवादळाने (Cyclone) जोरदार तडाखा दिला आहे. त्यामुळे मागील काही दिवसांपासून राज्यात हवामानाची स्थिती बेभरवशी झाली आहे. त्यामुळे यंदा राज्यात पावसाची (Monsoon) काय स्थिती असेल याबाबत शेतकऱ्यांना चिंता लागली होती. पण भारतीय हवामान खात्यानं (IMD) शेतकऱ्यांना दिलासा देणारी माहिती जारी केली आहे. यंदा राज्यात समाधानकारक पाऊस बरसणार असून राज्यात दुष्काळाची शक्यता जवळपास नसल्याचं भारतीय हवामान खात्याकडून सांगण्यात आलं आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या चिंता दूर झाल्या आहेत. मान्सूनचा दुसरा सुधारित अंदाज हवामान खात्याने मंगळवारी जारी केला आहे. यानुसार जून ते सप्टेंबर या कालावधीत देशभरात सरासरी 101 टक्के पावसाची शक्यता हवामान खात्याकडून वर्तवण्यात आली आहे. हवामान खात्याने यावर्षी पहिल्यांदाच 36 हवामान विभागातल्या पावसाचा अंदाज सांगितला आहे. या नवीन सुधारित अंदाजानुसार, यंदा कोकणात सरासरी पावसापेक्षा अधिक पाऊस पडण्याची शक्यता आहे. तर मराठवाडा आणि दक्षिण मध्य महाराष्ट्रात सरासरी पावसापेक्षा कमी पाऊस पडणार असल्याचा अंदाज हवामान खात्याकडून वर्तवण्यात आला आहे. हे वाचा-स्वयंपाक करताना सिलेंडरचा भीषण स्फोट, 8 जणांचा मृत्यू तर सात गंभीर जखमी खरंतर प्रशांत महासागरात सध्या 'ला निनो' स्थिती तयार झाली आहे. याचा मान्सूनला चांगलाच फायदा होत आहे. परिणामी पावसाळाच्या उतर्धात देशात चांगला पाऊस होण्याची शक्यता आहे. भारतात अद्याप जवळपास 60 टक्के नागरिक शेतीशी निगडीत व्यवसाय करतात. त्याचबरोबर देशातील 40  टक्के शेतकरी अजूनही पावसाच्या पाण्यावरचं अवलंबून आहेत. त्यामुळे मान्सूनचा पाऊस खूप महत्त्वपूर्ण ठरतो. अशात हवामान विभागाने शेतीक्षेत्राचा समावेश असलेल्या कोअर झोन निश्चित केला आहे. याठिकाणी 106 % पाऊस पडणार असल्याची माहितीही हवामान खात्याकडून देण्यात आली आहे. हे वाचा-देशात कोरोनाची तिसरी लाट अटळ? लसीकरणाबाबत केंद्राचा चिंताजनक रिपोर्ट कोकणासह विदर्भात अधिक पावसाची शक्यता हवामान खात्याच्या सुधारित अंदाजानुसार, कोकण आणि पूर्व विदर्भात सरासरी पावसापेक्षा जास्त पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. तर पश्चिम महाराष्ट्रासह मराठवाडातील काही भागांत जूनमध्ये कमी पावसाची शक्यता हवामान विभागाकडून वर्तवण्यात आली आहे. असं असलं तरी राज्यात दुष्काळ पडण्याची शक्यता केवळ 8 टक्के एवढी आहे.
First published:

Tags: Maharashtra, Monsoon, Weather update

पुढील बातम्या