राज्यात मेघगर्जनेसह पावसाची शक्यता, बदलणारं वातावरण 'कोरोना'साठी पोषक

राज्यात मेघगर्जनेसह पावसाची शक्यता, बदलणारं वातावरण 'कोरोना'साठी पोषक

देशासह राज्यात कोरोना व्हायरसचा प्रभाव वाढत असतानाच राज्याच्या काही भागांवर पुढील चार दिवसात मेघगर्जनेसह पावसाची शक्यता आहे.

  • Share this:

मुंबई,17 मार्च:देशासह राज्यात कोरोना व्हायरसचा प्रभाव वाढत असतानाच राज्याच्या काही भागांवर पुढील चार दिवसात मेघगर्जनेसह पावसाची शक्यता आहे. 17 ते 22 मार्चदरम्यान औरंगाबादसह संपूर्ण मराठवाड्यातील जिल्हे, विदर्भ, पश्चिम महाराष्ट्रातील सांगली, सातारा, सोलापूर, महाबळेश्वर, खान्देशमधील जळगाव जिल्ह्यात पाऊस पडण्याची शक्यता भारतीय हवामान विभागाने वर्तवली आहे. दुसरीकडे, मध्य प्रदेशाती भोपाळ, बैतूल, होशंगाबाद आणि देवास यासारख्या काही प्रमुख ठिकाणी देखील पाऊस पडू शकतो.

बदलणारं वातावरण 'कोरोना'साठी पोषक...

महाराष्ट्रात बदलणारे हे वातावरण कोरोना व्हायरससाठी पोषक असल्यामुळे चिंता वाढली आहे. नाशिक, मुंबई, ठाणे, रत्नागिरी, पुणे, मालेगाव, कोल्हापूर हे जिल्हे वगळता उर्वरित बहुतांश ठिकाणी जोरदार पावसाच्या सरी कोसळण्याची शक्यता आहे. यामुळे कमाल तापमानात 6 अंशांपर्यंत घट होऊन वातावरणात गारवा जाणवेल. त्यामुळे सर्दी, डोकेदुखी, ताप, खोकला, दमा आदी रोगांचा उपद्रव वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही.

हेही वाचा..कोरोनामुळे महाराष्ट्रात 'या' जिल्ह्यांध्ये कलम 144 लागू

भारतीय हवामान विभागाने दिलेली माहिती अशी की, हिंद महासागरावरील दाट ढगांचे आच्छादन, महाराष्ट्र आणि मध्य प्रदेशातील विविध भागावर तयार झालेला कमी हवेच्या दाबाचा पट्टा, चार दिशेकडून वाहत येणारे थंड, उष्ण, बाष्पयुक्त वारे, होणारे ढग व त्यात पृथ्वीवरून परावर्तित होणारी उष्णता यामुळे तापमानात अनपेक्षित चढउतार होत आहे. सापेक्ष आर्द्रता 100 टक्के, पोषक वातावरण तयार होते तेथे जोरदार पाऊस अन् गारपीट होत असते.

हेही वाचा..कोरोना व्हायरसनं निर्माण केलं देव आणि भक्तांमध्ये अंतर, साईबाबा, महालक्ष्मी मंदिर बंद

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Mar 17, 2020 10:29 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading