Home /News /maharashtra /

आणखी दोन दिवस राहणार ढगाळ वातावरण; अवकाळी पावसामुळे दुष्काळी भागांना दिलासा

आणखी दोन दिवस राहणार ढगाळ वातावरण; अवकाळी पावसामुळे दुष्काळी भागांना दिलासा

कोल्हापूर, सातारा, सांगली, वाशिम, मनमाडसह रत्नागिरीतल्या शहरी आणि ग्रामीण भागासह राज्यात अनेक ठिकाणी मंगळवारी पावसानं हजेरी लावली.

    मुंबई, 20 नोव्हेंबर - कोल्हापूर, सातारा, सांगली, वाशिम, मनमाडसह रत्नागिरीतल्या शहरी आणि ग्रामीण भागासह राज्यात अनेक ठिकाणी मंगळवारी पावसानं हजेरी लावली. ढगाळ वातावरणामुळे हवेत गारवा असून, पुढचे दोन दिवस असंच वातावरण हारणार असल्याचा अंदाज पुणे वेधशाळेनं वर्तवलाय. कोल्हापुरात तर 2 दोन दिवस ढगाळ वातावरण होतं. पन्हाळगडावर आज दीड तास जोरदार पाऊस बरसला. या पावसाचा काही प्रमाणामध्ये परिणाम ऊसतोडीवर झाला असला तरी रब्बी हंगामातील पिकांसाठी मात्र हा पाऊस वरदान ठरणाराय. दुसरीकडे साताऱ्यातील पावसानं कोयनेच्या पाणलोट क्षेत्रात मोठी वाढ झालीय. तर दुष्काळी भागाला या पावसामुळे मोठा दिलासा मिळालाय. कोल्हापूर शहरातही मंगळवारी सकाळपासून ढगाळ वातावरण होतं. जिल्ह्यातील गगनबाबडा, राधानगरी, चंदगडमध्ये मुसळधार पाऊस झाल्याची माहिती आहे. तर दुष्काळाच्या छायेत असलेल्या सातारा जिल्ह्याच्या अनेक भागातसुद्धा पावसाने हजेरी लावली. कराड, कोयना, पाटण, फलटण, कोरेगाव आणि खटाव तालुक्यात मुसळधार पाऊस पडला. या अवकाळी पावसामुळे टंचाईग्रस्त गावांना काही प्रमाणात दिलासा मिळला आहे. तर ज्वारी, गहू, हरभरा या पिकांना मोठा फायदा होणार आहे. कराड परिसरात दोन तास झालेल्या मुसळधार पावसामुळे ६ साखर कारखान्यांची उस तोड थांबलीय. कोयना धरण पाणलोट क्षेत्रात झालेल्या मुसळधार पावसामुळे धरणाच्या जलसाठ्यात काही प्रमाणात वाढ झाली असल्याची माहिती सुत्रांनी दिली. विदर्भात अकोला, बुलढाणा आणि वाशिम या तिन्ही जिल्ह्यांत अनेक भागातही पाऊस बरसला. तर मनमाड शहर परिसरासह मालेगाव, नांदगाव तालुक्यातील अनेक भागात मध्यम स्वरूपाचा पाऊस झाला. कोकणातल्या अनेक भागातही पावसानं हजेरी लावलीय. रत्नागिरी जिल्ह्यात संगमेश्वरसह चिपळूण, गुहागर परिसराला पहाटे पावसानं जोरदार झोडपलं. दुष्काळाच्या छायेत असलेल्या राज्याची बहुतांश भागांना अवकाळी पावसामुळे थोडा दिलासा मिळाला आहे. तर पुढचे दोन दिवस राज्यात असंच वातावरण हारणार असल्याचा अंदाज पुणे वेधशाळेनं वर्तवलाय.  VIDEO: एक वर्षाची मुलगी रेल्वे ट्रॅकवर पडली आणि समोरून आली एक्सप्रेस...!
    First published:

    Tags: Kolhapur, Manmad, Rainl, Ratnagiri, Sangali, Satara, Wshim

    पुढील बातम्या