पावसाचा अजब न्याय! राज्यात एकीकडे धुवांधार, तर या ठिकाणी विसर्जनाला पाणीच नाही

पावसाचा अजब न्याय! राज्यात एकीकडे धुवांधार, तर या ठिकाणी विसर्जनाला पाणीच नाही

मुंबई, कोकणात विसर्जनाच्या दिवशी पावसाचं टेन्शन तर तिकडे लातूरमध्ये गणेश विसर्जनासाठी नद्या-विहिरींना पाणीच नाही, अशी विचित्र परिस्थिती सध्या महाराष्ट्रात आहे. या वर्षी गणेश मूर्तींचं विसर्जनच न करण्याचा निर्णय लातूरमध्ये घेण्यात आला आहे.

  • Share this:

मुंबई, 11 सप्टेंबर : मुंबई, कोकणात विसर्जनाच्या दिवशी पावसाचं टेन्शन तर तिकडे लातूरमध्ये गणेश विसर्जनासाठी नद्या-विहिरींना पाणीच नाही, अशी विचित्र परिस्थिती सध्या महाराष्ट्रात आहे. गुरुवारच्या अनंत चतुर्दशीनिमित्त गणेश विसर्जनाची तयारी तर सुरू झाली आहे. पण या वर्षी पावसाने राज्यात जरा अन्यायच केला आहे. राज्यात काही ठिकाणी पुराचा धोका असताना दुसरीकडे भीषण पाणीटंचाई जाणवत आहे. या वर्षी उशीरा सुरू झालेल्या मान्सूनने जुलैमध्ये चांगलाच जोर धरला. विशेषतः मुंबई, ठाणे, कोकण, पश्चिम महाराष्ट्रात तो धुवांधार कोसळला. कोल्हापूर, सांगली, साताऱ्याला तर पुरानं वेढलं. तिकडे विदर्भातही गडचिरोली पाण्याखाली गेलं. अनेक गावांचा संपर्क तुटण्याएवढी पाण्याची पातळी वाढली. त्याच वेळी मराठवाडा विशेषतः लातूर, बीड, परभणी, वाशीम जिल्हा मात्र तहानलेलाच राहिला. लातूर शहरातली पाण्याची परिस्थिती तर इतकी बिकट आहे की गणेश मूर्तींचं विसर्जन करायलाही पुरेसं पाणी नाही.

लोकसत्ताने दिलेल्या बातमीनुसार, लातूरचे जिल्हाधिकारी जी. श्रीकांत यांनी गणेश मंडळाच्या पदाधिकाऱ्यांबरोबर एक बैठक घेतली आणि मूर्तींचं विसर्जन न करण्याचं आवाहन केलं.

हे वाचा - जगातलं सर्वाधिक पावसाचं ठिकाण आता महाराष्ट्रात, या हिलस्टेशनवर पडला तुफान पाऊस

गणेश मंडळांनीही त्याला सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. त्यामुळे कित्येक वर्षांत पहिल्यांदाच यंदा लातूरमध्ये गणेश विसर्जन होणार नाही. हा महिना पुरेल एवढाच पाणीसाठा लातूरमध्ये सध्या आहे. नळाने पाणीपुरवठा करण्यासाठी पुरेल एवढंच पाणी आहे. ते अर्थातच पिण्यासाठी वापरण्याला प्राधान्य आहे. विहिरींनाही या वर्षी पाणी नाही. त्यामुळे परिस्थितीचं गांभीर्य लक्षात घेऊन गणेश मंडळांनी गणेश मूर्तींचं विसर्जन न करता, मूर्ती तशाच ठेवायचा निर्णय घेतला आहे, असं वृत्त माध्यमांनी दिलं आहे.

हे वाचा - KBC 11 : 'बिहार का लाला' ठरला पहिला करोडपती, 1 कोटी जिंकून रचला इतिहास

गणेश मूर्ती दान करा, मूर्तीकारांना परत द्या किंवा विधीवत विसर्जनाची पूजा करून पाण्यात विसर्जित न करता तशीच ठेवा, असं आवाहन करण्यात येत आहे. लातूर शहरात जूनपासून आतापर्यंत फक्त  261.15 मिमी पाऊस झाला आहे. पालघर, ठाणे, मुंबईत एवढा पाऊस तर एकाच दिवशी पडलाय. लातूक जिल्ह्याची सरासरी थोडी अधिक म्हणजे 413.82 मिमी आहे. दुसरीकडे मुंबईत यंदाच्या मोसमात आत्तापर्यंत 3345 मिमी पावसाची नोंद झाली आहे. 2350 मिमीपेक्षा ती बरीच जास्त आहे आणि सप्टेंबरमध्येही पावसाची बॅटिंग सुरूच आहे.

VIDEO : भाजप प्रवेशाआधी हर्षवर्धन पाटलांनी पुन्हा बोलून दाखवली मनातील खदखद

First published: September 11, 2019, 1:02 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading