लॉकडाउन त्यात अवकाळी पाऊस, आता कांद्यानेही शेतकऱ्याला रडवलं

लॉकडाउन त्यात अवकाळी पाऊस, आता कांद्यानेही शेतकऱ्याला रडवलं

मनमाडच्या बाजारात कांद्याला सरासरी प्रति क्विंटल 500 ते 550 रुपये इतका भाव मिळाला आहे.

  • Share this:

मनमाड, 30 एप्रिल : राज्यात कोरोनाचा संसर्ग वेगानं पसरत आहे. त्यामुळे कोरोनाचं संक्रमण रोखण्यासाठी लॉकडाऊन पाळण्यात येत आहे. या लॉकडाऊनमुळे शेतकऱ्यांचं आधीच नुकसान झालं आहे. त्यात सतत होणारे हवामानातील बदल आणि हे लॉकडाऊन अशा दोन्ही समस्यांसोबत सामना करत असतानाच आता कांद्याच्या दरात मोठी घसरण झाली आहे. कांद्याचे भाव घसरल्यानं शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी आलं आहे. मनमाडच्या बाजारात कांद्याला सरासरी प्रति क्विंटल 500 ते 550 रुपये इतका भाव मिळाला आहे. मनमाड सह नाशिक जिल्ह्यातील इतर बाजार समितीत देखील भावात घसरण झाली आहे. कष्टाने पिकविलेल्या कांद्याला मातीमोल भाव मिळत असल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत.

मनमाडसह नाशिक शहरात कांद्याच्या भावात मोठी घसरण झाली आहे. कांद्याला 5 रुपये प्रति किलो दर मिळत आहे. आधीच हवामान होणारे बदल आणि त्यानंतर राज्यात 24 मार्चपासून लागलेला लॉकडाऊन त्यामुळे शेतमाल जास्त उचलला जात नव्हता. योग्य हमीभाव मिळत नव्हता आणि त्यातच आता कांद्याचे भाव मोठ्या प्रमाणात घसल्यानं शेतकऱ्याच्या डोळ्यात पाणी आलं आहे.

हे वाचा-BREAKING: 3 मेनंतर राज्यात लॉकडाउनमध्ये होणार बदल, अजित पवारांनी दिले संकेत

काय आहे मालेगाव, नाशिकची स्थिती

मुंबई, पुण्याठोपाठ मालेगाव शहर हॉटस्पॉट झालं आहे. बुधवारी रात्री आलेल्या अहवालानुसार मालेगाव शहरात 44 रुग्णांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्यानं मोठी खळबळ उडाली आहे. धक्कादायक बाब म्हणजे यामध्ये 3 महिन्यांच्या नवजात शिशुचा सामावेश आहे. यासोबत 2 वर्षांचा मुलगा आणि 12 पोलिसांचाही समावेश आहे. अत्यावश्यक सेवा आणि आपली जीव धोक्यात घालून अहोरात्र ड्युटी करणाऱ्या 12 पोलिसांनाही कोरोनाची लागण झाल्याचं समोर आलं आहे. चिंतेची बाब म्हणजे 24 तासांत मालेगावात 82 रुग्णांची भर पडली आहे.

हे वाचा-लॉकडाऊनंतर बदलणार मेट्रोचा प्रवास, बंद होऊ शकते 'ही' सेवा

संपादन- क्रांती कानेटकर

First published: April 30, 2020, 1:15 PM IST

ताज्या बातम्या