मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

नांदगाव शहरासह तालुक्यात गारपीट, अवकाळी पावसाने शेतकऱ्यांचं मोठं नुकसान

नांदगाव शहरासह तालुक्यात गारपीट, अवकाळी पावसाने शेतकऱ्यांचं मोठं नुकसान

नाशिक जिल्ह्यातील नांदगाव शहर परिसरासह तालुक्यातील काही भागात शुक्रवारी गारपीटसह अवकाळी पावसाने तडाखा दिला.

मनमाड,29 फेब्रुवारी: नाशिक जिल्ह्यातील नांदगाव शहर परिसरासह तालुक्यातील काही भागात शुक्रवारी गारपीटसह अवकाळी पावसाने तडाखा दिला. काही ठिकाणी हलक्या स्वरूपाच्या सरी पडल्या तर काही ठिकाणी दमदार पाऊस झाला. कोणाच्या ध्यानीमनी नसताना भर उन्हाळ्यात अचानक पाऊस आल्यामुळे नागरिकांची चांगलीच तारांबळ उडाली. खळ्यात, मळ्यात उघडयावर असलेला कांदा भिजून खराब झाला असून शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. दरम्यान, तीन दिवसांपूर्वी विदर्भातील गोंदिया जिल्ह्यात अनेक ठिकाणी वादळी वाऱ्यासह गारपीटीने नागरिकांना झोडपून काढले होते. वादळी वाऱ्यासह पाऊस आणि गारपीटमुळे शेतकऱ्यांच्या शेतातील हळद, पालेभाज्या आणि पपईसह फळबागांचे मोठे नुकसान झाले आहे. हेही वाचा...कर्जमाफीची दुसरी यादी जाहीर, संध्याकाळपर्यंत खात्यात रक्कम जमा करण्याचे काम सुरू आमगाव तालुक्यातील अवकाळी संध्याकाळी 6 वाजता पासून जोरदार अवकाळी पावसाने तडाखा दिला. जोरदार पावसा सहवादळ वारे व गारांचा पाऊस झाला, अचानक आलेल्या पावसाने नागरिकांत दहशत निर्माण झाली होती. अचानक हवामानात बदल झाल्याने पावसामुळे पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. शेतकरी पुन्हा हवालदिल झाल्याचे चित्र दिसत आहे. नागपूर, भंडारा, गोंदिया , या जिल्ह्यात झालेल्या अवकाळी पावसाचा फटका येथील शेती पिकांना बसला आहे. सविस्तर वृत्त थोड्याच वेळात...
First published:

Tags: Hailstorm, Maharashtra news, Nashik rain

पुढील बातम्या