रायगड, 09 जून: रायगड (Raigad) जिल्ह्यात मंगळवारपासून रिमझिम पाऊस सुरू झाला आहे. दोन दिवसांपासून सुरु असलेल्या पावसानं (Rain Updates) कालच जिल्ह्यात अनेक भागात जोरदार तर काही ठिकाणी रिमझिम अशी हजेरी लावली. उद्या म्हणजे 10 आणि 11 जूनला जिल्ह्यात अतिवृष्टी होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. त्यामुळे हे दोन दिवस रायगडकरांसाठी धोकादायक आहेत. अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाने सर्व यंत्रणांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. समुद्र, नदी, धरण वाहत्या पाण्यात जाण्यास बंदी घालण्यात आली आहे. तसंच समुद्र आणि खाडीकिनारी गावांना आणि नागरिकांना, प्रशासकीय यंत्रणांना सतर्क राहण्याचे आदेश जिल्हाधिकारी यांनी दिले आहेत.
अतिवृष्टीच्या काळात समुद्र, नदी, धरण या ठिकाणी पावसाच्या पाण्याच्या प्रवाहाचा जोर जास्त असतो. या ठिकाणी काहीजण उत्साहाच्या भरात पोहण्याचा आनंद लुटण्यास जातात. अशा वेळी त्यांच्या जीवाला धोका निर्माण होण्याची शक्यता असते. त्यामुळे अतिवृष्टी काळात विशेषतः तरुणांनी अशा ठिकाणी पोहण्यासाठी जाऊ नये, असे आवाहन जिल्हाधिकारी निधी चौधरी यांनी आवाहन केले आहे.
रायगड जिल्ह्यात दोन दिवसापासून पावसाचे आगमन, काही ठिकाणी रिमझिम पावसाला सुरुवात pic.twitter.com/qUyZC26Bn3
— News18Lokmat (@News18lokmat) June 9, 2021
अतिवृष्टी आणि भरतीमुळे समुद्र, खाडी भागात किनाऱ्याला समुद्राचे पाणी बाहेर येण्याची शक्यता असते. समुद्र, खाडी किनारी गावात पाणी शिरून पूरस्थिती निर्माण होऊ शकते. त्या दृष्टीने नागरिकांनी सतर्क राहावं, अशा सूचना जिल्हा प्रशासनाने दिल्या आहेत. तसेच आपत्कालीन परिस्थिती निर्माण झाल्यास, अशा वेळी नागरिकांना तात्काळ सुरक्षित स्थळी हलविण्याचे निर्देश स्थानिक प्रशासनाला देण्यात आले आहेत.
हेही वाचा- आज मुंबई- गोवा महामार्गावरुन प्रवास करणाऱ्यांसाठी ही महत्त्वाची बातमी
आपत्कालीन परिस्थितीत नागरिकांनी जिल्हा आपत्ती व्यवस्थापन किंवा स्थानिक प्रशासनाकडे तात्काळ मदत मागावी, असंही आवाहन निधी चौधरी यांनी केलंय.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Raigad news, Rain, Rain fall