Home /News /maharashtra /

Rain Update Maharashtra : राज्यातील महत्वाच्या शहरांमध्ये अतिमुसळधार, तर नदी काठच्या गावांना सतर्कतेचा इशारा

Rain Update Maharashtra : राज्यातील महत्वाच्या शहरांमध्ये अतिमुसळधार, तर नदी काठच्या गावांना सतर्कतेचा इशारा

राज्यातील काही भागात मागच्या दोन दिवसांपासून मुसळधार पावसाने हजेरी लावली. कोकण, मध्य महाराष्ट्रासह, विदर्भ, मराठवाड्यात पावसाने काही जिल्ह्यात पावसाच्या सरी बरसल्या

  मुंबई, 06 ऑगस्ट : काही काळ विश्रांती घेतलेल्या पावसाने पुन्हा थैमान घालण्यास सुरूवात केली आहे. राज्यातील काही भागात मागच्या दोन दिवसांपासून मुसळधार पावसाने हजेरी लावली. (Rain Update Maharashtra) कोकण, मध्य महाराष्ट्रासह, विदर्भ, मराठवाड्यात पावसाने काही जिल्ह्यात पावसाच्या सरी बरसल्या दरम्यान पुढे चार दिवस राज्यातील कोल्हापूर, सातारा, पुणे, सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड, पालघर, मुंबई, नाशिक, ठाणे, भंडारा, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया या भागांत 9 ऑगस्टपर्यंत हवामान विभागाने 'ऑरेंज अलर्ट' जारी केला आहे.

  या भागांत अतिमुसळधार पाऊस पडेल, असा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे. दरम्यान, उर्वरित भागातही मुसळधार पाऊस पडणार आहे. राज्यात गेल्या दोन दिवसांपासून मान्सून पुन्हा सक्रिय झाला आहे. बंगालच्या उपसागरातील मध्य पूर्व आणि उत्तर पश्चिम भागात 7 ऑगस्टला कमी दाबाचा पट्टा तयार होणार आहे.

  हे ही वाचा : Pune : टीईटी पेपरफुटी प्रकरणातील आरोपी सुशील खोडवेकर पुन्हा प्रशासकीय सेवेत रुजू

  यामुळे पावसाचा जोर आणखी वाढणार आहे. सध्या बंगालच्या उपसागरापासून ते आंध्र प्रदेशाच्या किनारपट्टीपर्यंत हवेच्या वरच्या भागात द्रोणीय स्थिती तयार झाली होती. त्यामुळे राज्यात पाऊस सक्रिय झाला आहे. कमी दाबाचा पट्टा तयार होणार असल्याने या भागाकडून राज्याकडे बाष्प वाहू लागले आहे. त्यामुळे कोकण, मध्य महाराष्ट्र आणि विदर्भाच्या काही जिल्ह्यांत अतिमुसळधार पाऊस बरसणार आहे. तर उर्वरित भागातही मुसळधार पाऊस पडणार आहे.

  कोल्हापूर, पालघर, ठाणे, मुंबई, रायगड, सिंधुदुर्ग, रत्नागिरी, नाशिक, पुणे (घाटमाथा), सातारा, औरंगाबाद, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया या भागात 6 ते 9 ऑगस्ट या भागांत ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे.

  हे ही वाचा : गुजरात फॉर्म्युला की 2014 रिटर्न? मंत्रिमंडळाबाबत भाजपचं नेमकं काय ठरलं

  राज्यात मान्सून पुन्हा सक्रिय

  11 ऑगस्टपर्यंत राज्यात सर्वदूर पाऊस असल्याचे सांगण्यात आले आहे. कोकण, गोवा, घाटमाथ्यावर अतिवृष्टीचा इशारा  देण्यात आला आहे. मुंबईतही 7-8 ऑगस्टला मुसळधारची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. राज्यातील अनेक भागात पाऊस पुन्हा बरसण्यास सुरुवात झाली आहे. अनेक जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाची हजेरी सोलापूर, यवतमाळ, जालना, धुळे यासह अनेक जिल्ह्यांमध्ये मुसळधार पाऊस झाला आहे.

  Published by:Sandeep Shirguppe
  First published:

  Tags: Maharashtra News, Monsoon, Weather, Weather forecast, Weather warnings

  पुढील बातम्या