बंगालच्या उपसागरातील मध्य पूर्व आणि उत्तर पश्चिम भागात 7 ऑगस्टला कमी दाबाचा पट्टा तयार होणार आहे. यामुळे पावसाचा जोर आणखी वाढणार आहे. सध्या बंगालच्या उपसागरापासून ते आंध्र प्रदेशाच्या किनारपट्टीपर्यंत हवेच्या वरच्या भागात द्रोणीय स्थिती तयार झाली होती. त्यामुळे राज्यात पाऊस सक्रिय झाला आहे. कमी दाबाचा पट्टा तयार होणार असल्याने या भागाकडून राज्याकडे बाष्प वाहू लागले आहे. त्यामुळे कोकण, मध्य महाराष्ट्र आणि विदर्भाच्या काही जिल्ह्यांत अतिमुसळधार पाऊस बरसणार आहे. तर उर्वरित भागातही मुसळधार पाऊस पडणार आहे. चंद्रपूरमधील संपूर्ण गाव डायरियाच्या विळख्यात; दूषित पाण्यामुळे चौघांचा मृत्यू या जिल्ह्यांना अलर्ट कोल्हापूर, पालघर, ठाणे, मुंबई, रायगड, सिंधुदुर्ग, रत्नागिरी, नाशिक, पुणे (घाटमाथा), सातारा, औरंगाबाद, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया या भागात 6 ते 9 ऑगस्ट या भागांत ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. राज्यात मान्सून पुन्हा सक्रिय 11 ऑगस्टपर्यंत राज्यात सर्वदूर पाऊस असल्याचे सांगण्यात आले आहे. कोकण, गोवा, घाटमाथ्यावर अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे. मुंबईतही 7-8 ऑगस्टला मुसळधारची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. राज्यातील अनेक भागात पाऊस पुन्हा बरसण्यास सुरुवात झाली आहे. अनेक जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाची हजेरी सोलापूर, यवतमाळ, जालना, धुळे यासह अनेक जिल्ह्यांमध्ये मुसळधार पाऊस झाला आहे.6 Aug: येत्या ५ दिवसांचा मान्सून राज्यात सक्रिय राहील आणि त्यातही हळूहळू वाढ होईल. राज्यातील जिल्हास्तरीय इशाऱ्यांबरोबरच मच्छिमारांचे इशारे आणि खोल समुद्रासाठीही इशारे आहेत. कृपया IMD कडून दररोज अपडेट्स पहा. https://t.co/9Yro7fSSyR
— K S Hosalikar (@Hosalikar_KS) August 6, 2022
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Rain fall