• Home
  • »
  • News
  • »
  • maharashtra
  • »
  • मुंबईसह राज्यभरात पावसाची संततधार, येत्या 24 तासात मुसळधार पावसाचा अंदाज

मुंबईसह राज्यभरात पावसाची संततधार, येत्या 24 तासात मुसळधार पावसाचा अंदाज

मुंबईसह राज्यभरात सलग दुसऱ्या दिवशीही जोरदार पाऊस सुरूच आहे. नशिकमध्ये गोदावरीला पूर आला आहे. येत्या 24 तासात मुंबईत मुसळधार पावसाचा अंदाज हवामान खात्यानं वर्तवला आहे.

  • Share this:
  मुंबई, 15 जुलै: मुंबईसह राज्यभरात सलग दुसऱ्या दिवशीही जोरदार पाऊस सुरूच आहे. नशिकमध्ये गोदावरीला पूर आला आहे. येत्या 24 तासात मुंबईत मुसळधार पावसाचा अंदाज हवामान खात्यानं वर्तवला आहे. आपत्तकालीन यंत्रणेला सज्जतेचा इशारा देण्यात आला आहे. मुंबईतही काल रात्रभर पावसाने चागंलीच हजेरी लावलीय. या पडलेल्या पावसामुळे कुठेही पाणी तुंबलेले नाहीये. तर रेल्वे आणि रस्ते वाहतूकही सुरळीत सुरू आहे. मुंबई शहरात काल दिवसभरात ३१.९३ मिमी, पूर्व उपनगर ७३.८९ मिमी, मुंबई पश्चिम उपनगर ५३.७३ पावसाची नोंद झालीय. मुंबईत आज ४ वाजून ७ मिनटांनी ४.०३ मीटर उंचीची भरती येणार आहे. राज्यात गेल्या 15-20 दिवसांपासून दडी मारून बसलेल्या वरूणराजाने गुरूवारपासून दमदार पुनरागमन केले आहे. नाशिकसह उत्तर महाराष्ट्र, कोकण परिसरात गुरुवारपासून दमदार पाऊस सुरू झाला असून, पुणे, नगरसह पश्चिम महाराष्ट्रातही अनेक ठिकाणी पावसाची चांगली नोंद झाली आहे. नाशिक, कोकणात पावसाने कहर केला असला, तरी पाऊस परतल्याने शेतकरी सुखावले आहेत. पुणे शहर आणि परिसरात गुरुवारपाठोपाठ शुक्रवारी पावसाची हजेरी कायम होती. पुणे शहरात रात्री साडेआठपर्यंत २.६ मिमी पावसाची नोंद झाली. पुढील दोन दिवसांत राज्यात सर्वदूर चांगला पाऊस पडण्याची शक्यता पुणे वेधशाळेने वर्तवली आहे. नाशिकमध्ये पावसामुळे गोदावरी नदी दुथडी भरून वाहू लागली असून पूरसदृश परिस्थिती निर्माण झाली. गुरुवारी रात्रीपासून सुरू झालेल्या पावसामुळे गंगापूर धरणातील पाणीपातळीत २० टक्क्यांनी वाढ झाली आहे.
First published: