'बाप्पां'च्या आगमनाला पावसाची हजेरी!

'बाप्पां'च्या आगमनाला पावसाची हजेरी!

ऑगस्ट महिन्याच्या सुरुवातीला मुसळधार पावसाने हजेरी लावली होती. आता गणपतीच्या आगमनावेळी पुन्हा पावसाने हजेरी लावलीय. त्यामुळे बळीराजा सुखावलाय.

  • Share this:

मुंबई 1 सप्टेंबर : बाप्पांचं आगमन होत असताना राज्यातल्या अनेक भागात पावसाचं आगमन झालंय. पुणे, मुंबई, कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रातल्या अनेक भागात गेल्या दोन दिवसांपासून पाऊस सुरू आहे. तर विदर्भातल्या काही भागात पाऊस आहे. मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्रात मात्र तुरळक ठिकाणीच पाऊस आहे. मुंबई पुण्यात आजपासूनच गणपती बाप्पांना वाजत गाजत मंडपात आणायला सुरूवात होते. त्यातच पाऊस असल्याने अनेक मंडळांच्या कार्यकर्त्यांची चांगलीच तारांबळ उडालीय. बाप्पांना आणताना अतिशय काळजी घ्यावी लागतेय. तर पावसामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळालाय.

ऑगस्ट महिन्याच्या सुरुवातीला मुसळधार पावसाने हजेरी लावली होती. त्यानंतर कोल्हापूरात महापूर आला होता. नंतर पावसाने विश्रांती घेतली होती. आता गणपतीच्या आगमनावेळी पुन्हा पावसाने हजेरी लावलीय.

कोकण

गेल्या चार दिवसांपासून रत्नागिरी जिल्ह्यातल्या खेडमध्ये मुसळधार पाऊस पडत असून खेड बस स्थानकाला गळती लागली आहे. गणेशोत्सवाच्या पार्शवभूमीवर शेकडो प्रवासी कोकणात आले असून बस स्थानकाला गळती लागल्याने प्रवाशांना छत्री उघडून बस स्थानकात उभं राहावं लागतं. बस स्थानकाच्या छतातून पावसाच्या धारा वाहत आहेत. स्थानकात पावसाच्या पाण्याची डबकी साचली आहेत. परिसरात अस्वच्छता देखील झाली आहे या सर्व प्रकारामुळे प्रवासीवर्गात नाराजी पसरलीय.

'समुद्रात नाव बुडताना उंदीर उडी मारतात तशी 'राष्ट्रवादी'ची स्थिती'

शिर्डी

शिर्डी परिसरात आज जोरदार पावसाने हजेरी लावलीय. एक महिन्याच्या प्रतीक्षेनंतर पावसाला सुरुवात झाल्याने शेतकरी सुखावले आहेत. शिर्डीसह राहाता, बाभळेश्वर लोणी आणी कोल्हार येथे पाऊस झालाय या पावसामुळे मान टाकलेल्या शेतातील पिकांना जिवदान मिळणार आहे. गेल्या एक महिन्यापासून अहमदनगर जिल्ह्यातील शेतकरी पावसाची वाट बघत होते. त्यामुळे आता परतीच्या पावसाला जोरदार सुरूवात झाली असून जिल्ह्यातील शेतकऱ्यांना काहीसा दिलासा मिळाला आहे.

नाशिक

गेल्या 25 दिवसा पासून दडी मारून बसलेल्या पावसाचं येवला,लासलगाव, देवळायासह नाशिकच्या ग्रामीण भागात आज जोरदार पुनरागमन झालं. सुमारे एक तासा पेक्षा जास्त वेळ मुसळधार पावसाने अक्षरशः अनेक गावांना झोडपून काढलं. दमदार पाऊस झाल्यामुळे करपू लागलेल्या पिकांना नवसंजीवनी मिळाली त्यामुळे चिंतेत असलेल्या बळीराजाने सुटकेचा नि:श्वास सोडलाय. पावसाने विश्रांती घेतल्यामुळे तापमानात वाढ झाली होती मात्र आज जोरदार पाऊस झाल्याने उकाड्याने हैराण झालेल्या नागरिकांनाही मोठा दिलासा मिळालाय.

मुख्यमंत्र्यांकडे वॉशिंग पावडर, भाजपमध्ये प्रवेश करणारे 'संत' नाहीत - खडसे

खेडमध्ये मगरींचा जोर

रत्नागिरी जिल्ह्यातल्या खेड मधील शहर लगत वाहणाऱ्या जगबुडी नदी मध्ये अनेक महाकाय मगरींचा संचार सुरु झालाय. अगदी शहराला लागून वाहणाऱ्या या नदीमध्ये महाकाय आठ ते दहा फुटांच्या मगरी वावरत असल्याने नदीकाठच्या परिसरात चिंतेचे वातावरण पसरले आहे. या मगरी पाहण्यासाठी लोकांची एकच गर्दी होत आहे. रात्रीच्या वेळी या मगरी नदीकाठी येऊन रस्त्यावर देखील विसावतात. रात्रीच्या वेळी  या नदीकाठच्या परिसरात भीती पोटी खेड मधील कोणही फिरकत देखील नाही. सध्या पावसामुळे नदीच्या पाण्याच्या पातळीत वाढ झाल्याने या मगरींनी नदीचा ताबाच घेतलाय.

Published by: Ajay Kautikwar
First published: September 1, 2019, 6:39 PM IST
Tags: rain

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading