वीज कोसळून शेतात काम करणाऱ्या एकाच कुटुंबातील 4 जणांसह 5 ठार

वीज कोसळून शेतात काम करणाऱ्या एकाच कुटुंबातील 4 जणांसह 5 ठार

शेतात ज्वारी काढण्यासाठी गेलेल्या एकाच कुटुंबातील चार जणांचा मृतांत समावेश आहे. रोजंदारीवर काम करणारी महिलाही यात ठार झाली आहे.

  • Share this:

राजेश भागवत,(प्रतिनिधी)

जळगाव, 26 सप्टेंबर: धरणगाव तालुक्यातील भवरखेडा येथे वीज कोसळून 5 जणांचा मृत्यू झाला आहे. शेतात ज्वारी काढण्यासाठी गेलेल्या एकाच कुटुंबातील चार जणांचा मृतांत समावेश आहे. रोजंदारीवर काम करणारी महिलाही यात ठार झाली आहे.

मिळालेली माहिती अशी की, बोरगाव (ता.धरणगाव) येथून जवळच असलेल्या भवरखेडे येथे गुरुवारी दुपारी ही धक्कादायक घटना समोर आली आहे. भवरखेडे गावातील रघुनाथ दशरथ पाटील (वय-50) हे पत्नी अलका रघुनाथ पाटील (वय- 45), सून लता उदय पाटील (वय- 35), दुसरी सून शोभा भागवत पाटील (वय-40) व गावातील रोजंदारीवरील महिला कल्पना भैय्या पाटील (वय-35) यांच्यासह ज्वारी काढण्यासाठी शेतात गेले होते. त्याचवेळी नेमका परिसरात विजेच्या गडगडासह मुसळधार पावसाला सुरुवात झाली. यावेळी सर्व कुटुंब शेतातील एका झाडाखाली आश्रयासाठी थांबले होते. मात्र, त्याच झाडावर अचानक एक वीज कोसळली. त्यात पाचही जणांचा जागीच मृत्यू झाला. या घटनेमुळे भवरखेडे गावावर शोककळा पसरली आहे.

दरम्यान, घटनेची माहिती मिळताच धरणगाव येथून प्रशासकीय यंत्रणा भवरखेडे येथे जाण्यासाठी रवाना झाली असल्याचे समजते. वीज पडून एकाच कुटुंबातील चार जणांसह पाच जणांचा मृत्यू झाल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.

पुण्यात मुसळधार पावसाने 5 जणांचा जीव घेतला, 5 अद्याप बेपत्ता!

दरम्यान, मुंबई, कोकणसह पावसाची संततधार वगळता संपूर्ण महाराष्ट्रात परतीच्या पावसाने अक्षरश: झोडपून काढले आहे. पुण्यात बुधवारी झालेल्या मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. आंबील ओढ्याला आलेल्या पुरात तब्बल 10 जण वाहून गेले आहेत. यातील 5 जणांचे मृतदेह पोलिसांच्या हाती लागले असून इतर जणांचा शोध सुरू असल्याचे सांगण्यात येत आहे. NDRF ची तीन पथके यासाठी घटनास्थळी दाखल झाली आहेत. त्यामुळे महापालिकेच्या यंत्रणांना सतर्क राहण्याचा इशारा महापौरांनी दिला आहे.

पुणे शहराला रात्री मुसळधार पावसाने झोडपून काढले. आंबील ओढा ओव्हरफ्लो झाला आहे. त्यामुळे लोकांच्या घरात पाणीच पाणी शिरलं आहे. कात्रज, बिबवेवाडी , सहकारनगर, हनुमाननगर, दत्तवाडी, दांडेकर पूल कोल्हेवाडी, किरकीटवाडी, मांगडेवाडी भागातील घरांमध्ये गुडघ्याभर पाणी शिरले आहे. 3 ते 4 जण वाहून गेल्याची शक्यता वर्तवली जात आहे. अनेक भागात वीजपुरवठा बंद करण्यात आला आहे. कात्रज नवीन बोगद्यात पाणी साचल्याने वाहने अडकून पडली आहेत. एनडीआरएफच्या तुकड्या कात्रजमध्ये दाखल झाल्यात. दांडेकर पूल इथल्या ओढ्याशेजारील घरांमध्ये पावसाचे पाणी शिरलं आहे. त्यामुळे नागरिकांनी तात्काळ मदतीचे आवाहन केले आहे.

पुणे: पाण्यात अडकलेल्या चिमुकल्याच्या रेस्क्यू ऑपरेशनचा थरारक VIDEO

First published: September 26, 2019, 3:18 PM IST
Tags:

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading