रत्नागिरी-सिंधुदुर्गमध्ये मान्सूनपूर्व पाऊस

रत्नागिरी-सिंधुदुर्गमध्ये मान्सूनपूर्व पाऊस

रत्नागिरीमध्ये अनेक ठिकाणी मान्सूनपूर्व पाऊस पडतोय. तर सिंधुदुर्गातही अनेक ठिकाणी सरी पडतायेत.

  • Share this:

रत्नागिरी, 29 मे : महाराष्ट्राला सध्या वेध लागलेत ते पावसाचे. उकाडा आणि घाम इतका आहे की असं झालंय कधी पाऊस पडतोय. कोकणवासी मात्र भाग्यवान ठरतायेत. रत्नागिरीमध्ये अनेक ठिकाणी मान्सूनपूर्व पाऊस पडतोय. तर सिंधुदुर्गातही अनेक ठिकाणी सरी पडतायेत.

मान्सूनचं केरळात आगमन झाल्याचं वृत्त स्कायमेट या खासगी संस्थेनं दिलंय. केरळमार्गे मान्सूनचं आगमन झाल्याचं स्कायमेटच्या वेबसाईटवर जाहीर करण्यात आलंय. केरळ किनारपट्टीवर पावसासाठी पोषक वातावरण निर्माण झाल्यानं मान्सूनचं आगमन झालंय,असं स्कायमेटनं म्हटलंय. २८ मे रोजी केरळमध्ये मान्सून दाखल होईल असा अंदाज स्कायमेटनं आधी वर्तवला होता.

First published: May 29, 2018, 11:23 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading